Sher Shivraj : अफझल खानाचा फसलेला डाव आणि शिवरायांच्या पराक्रमाची यशस्वी गाथा

मुंबई तक

छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सगळं आजही आपल्या डोळ्यासमोर आलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या साहसी पराक्रमाने आपले रोमांच जागे होतात. त्यांची ही अजरामर कथा जेव्हा सिनेमा स्वरूपात आपण याची देही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा कृत्यकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि हिच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजलखानाची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सगळं आजही आपल्या डोळ्यासमोर आलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या साहसी पराक्रमाने आपले रोमांच जागे होतात. त्यांची ही अजरामर कथा जेव्हा सिनेमा स्वरूपात आपण याची देही याची डोळा मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा कृत्यकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि हिच दिग्पाल लांजेकरच्या शेर शिवराज सिनेमाची खासियत आहे जी आपल्याला सेकंदा सेकंदाला खिळवून ठेवते.

किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. ‘गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळते.

हे वाचलं का?

    follow whatsapp