Shinde सरकारचा जाहिरातीवर कोट्यावधींचा खर्च; दिवसाला लागतात ‘इतके’ लाख!
Shinde fadnavis Government : बारामती : शिंदे सरकारने ३० जून ते २५ जानेवारीपर्यंत या ७ महिन्यांच्या काळात (२१५ दिवस) जाहिरातीसाठी तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती आणि जनसंपर्क विभागाकडे माहिती मागितली होती. हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातील पैसा असल्याचं यादव […]
ADVERTISEMENT
Shinde fadnavis Government : बारामती : शिंदे सरकारने ३० जून ते २५ जानेवारीपर्यंत या ७ महिन्यांच्या काळात (२१५ दिवस) जाहिरातीसाठी तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी याबाबत माहिती आणि जनसंपर्क विभागाकडे माहिती मागितली होती. हा पैसा सर्वसामान्यांच्या खिशातील पैसा असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे. (Shinde fadnavis Government spends 42 crores on advertising)
ADVERTISEMENT
नितीन यादव म्हणाले, नुकतेच राज्य शासनाकडून ही देयके मला उपलब्ध झाली. ७ महिन्यांमध्ये जाहिरातीसाठी तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. या खर्चाची सरासरी काढल्यास दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये शासकीय तिजोरीतून खर्च केल्यास दिसून येते. सर्वसामान्यांच्या खिशातून शासनाकडे जाणार हा पैसा असून या खर्चावर शासन आता तरी अंकुश लावेल का आणि फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
PM मोदींची इच्छा २ आठवड्यांत पूर्ण! BMC हजारो कोटींच्या ठेवी मोडणार
हे वाचलं का?
कोणत्या गोष्टीसाठी किती झाला खर्च?
-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम : ९/८/२०२२ ते ११/८/२०२२ आणि १३/८/२०२२ – १० कोटी, ६१ लाख, ५६८ रुपये.
केंद्र शासनाचा उपक्रम असलेला ‘बुस्टर डोस’ : १८, २३, ३० ऑगस्ट आणि ७, १३, २३ सप्टेंबर – ८६ लाख ७० हजार ३४४ रुपये
ADVERTISEMENT
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा : १७ सप्टेंबर २०२२ – ४ कोटी ७२ लाख ५८ हजार १४८ रुपये
ADVERTISEMENT
मराठी भाषा – मराठी तितुका मेळवावा : ४ जानेवारी २०२३ – १ कोटी ७६ लाख १ हजार १९२
जी-२० : ४ जानेवारी २०२३ – ८५ लाख १६ हजार ५९२
राज ठाकरेंच्या मध्यस्थीनंतरही भाजपचं टेन्शन वाढलं! ‘मविआ’चा निर्णय झाला
-
उद्योग (रत्नांचा सागर) : १६ डिसेंबर २०२२ – ८ लाख ७४ हजार ९४४
-
१०८ इंडियन सायन्स काँग्रेस : ३ जानेवारी २०२३ – २ कोटी ३७ लाख
-
राज्यस्तरीय रोजगार मेळावा : ३ नोव्हेंबर २०२२ – ७ कोटी ५७ लाख ४५ हजार
-
एमएमआरडीए : १९ जानेवारी २०२३ – १ कोटी १३ लाक ४७ हजार २०० रुपये
-
मरारवि महामंडळ : ८, १०, ११ डिसेंबर – ११ कोटी ५० लाख
-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती : २३ जानेवारी २०२३ – ९६ लाख ४० हजार ६८० रुपये
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT