‘चिरडायचं नसेल तर हाच एक पर्याय’; काँग्रेस, राष्ट्रवादीला सेनेचा सल्ला
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आघाडीची अखेर घोषणा झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीबद्दल प्रश्न उपस्थित होताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका काय असेल, असाही प्रश्न यानिमित्ताने होत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (UBT) महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना सल्ला वजा इशारा दिलाय. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी केल्यानंतर उद्धव […]
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आघाडीची अखेर घोषणा झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीबद्दल प्रश्न उपस्थित होताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका काय असेल, असाही प्रश्न यानिमित्ताने होत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (UBT) महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना सल्ला वजा इशारा दिलाय.
ADVERTISEMENT
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे आधीच्या दोन मित्र पक्षांना कसं, टिकवून ठेवणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला स्वीकारणार का, याची उत्सुकता आहे. त्यातच आज सामना अग्रलेखातून शिवसेनेनं (UBT) महाविकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांना भविष्यातील धोक्याचा इशारा देताना जुळवून घेण्याचाच सल्ला दिलाय.
शिवसेनेनं (UBT) सामना अग्रलेखात म्हटलंय की, “प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीस मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत 14 टक्के मते मिळाली व त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या युतीचे नुकसान झाले. आंबेडकरांनी मार्ग बदलल्यामुळे यापुढे मतविभागणी टाळता येईल व लोकसभा, विधानसभा निवडणुकांत हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करता येईल.”
हे वाचलं का?
Uddhav Thackeray : मोदी आले तरी ‘बाळासाहेबांशिवाय’ मतं मिळू शकत नाहीत!
महाविकास आघाडी सूत्र… शिवसेनेनं (UBT) काय म्हटलंय?
पुढे शिवसेनेनं (UBT) असंही म्हटलं आहे की, “काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वेगळे मत आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचेही या दोन पक्षांविषयी वेगळे मत होतेच व पुढे किमान समान कार्यक्रमांवर हे तीन पक्ष एकत्र आले व त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चालवले. त्यामुळे महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेसला ऍड. आंबेडकरांची अडचण वाटण्याचे कारण नाही.”
ADVERTISEMENT
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वंचित आघाडीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय भूमिका परस्पर विरोधी राहिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र कसे येणार याबद्दलही चर्चा सुरू झालीये. यापार्श्वभूमीवर शिवसेनेनं (UBT) दिल्लीकडे बोट दाखवत भविष्यातील राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं म्हटलंय की, “दिल्लीतील सत्ता लोकशाही व स्वातंत्र्याचे सर्व संकेत पायदळी तुडवत आहे व आता त्यांनी न्यायालयांवरही ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. हे देशाच्या भवितव्यासाठी घातक आहे. या बुलडोझरखाली चिरडायचे नसेल तर मतभेद गाडून ऐक्याचा नारा देणे हाच पर्याय आहे.”
Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?
“राहुल गांधी देशातील ‘नफरत’ म्हणजे द्वेषभावना मिटविण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रा काढीत आहेत. त्याच भावनेने सगळ्यांनी जुनेपुराणे भेद गाडून भीमशक्तीबरोबर पुढचे पाऊल टाकायला हवे”, असं म्हणत शिवसेनेनं (UBT) जुने राजकीय वाद विसरून प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT