Shiv Sena: …तर न्याय मिळेल, आंबेडकरांनी ठाकरेंना सांगितला नेमका मुद्दा
Prakash Ambedkar Reaction after shiv Sena bow and arrow symbol decision : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) निर्णयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टात (Supreme […]
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar Reaction after shiv Sena bow and arrow symbol decision : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) निर्णयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली. तसेच याविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाण्याच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, सुप्रीम कोर्टात आव्हान देताना एक महत्त्वाचा सल्ला आंबेडकरांनी दिला.
ADVERTISEMENT
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या अधिकारांबद्दलच प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगाने काल (17 फेब्रुवारी) शिवसेना प्रकरणावर निकाल दिला. आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात, सुप्रीम कोर्टात जाऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मी त्यांचं कौतुक करतो की, त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करायला हवी.”
हे वाचलं का?
Shiv Sena: ‘धनुष्यबाण’ गेला, ‘मशाल’ही जाणार?, ठाकरेंचं टेन्शन वाढणार!
निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत का?, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक आयोगाच्या जबाबदाऱ्यांचा उल्लेख करताना अधिकारांबद्दल भाष्य केलं आहे. राजकीय पक्षात वाद असतील, तर त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे का? असा प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. ते म्हणतात, “सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, निवडणूक चिन्ह, पक्षातील वाद यावर निकाल देणं हे निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.”
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाच्या अधिकारांबद्दल आणि भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करतानाच प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या भूमिकेचं समर्थन करताना आंबेडकरांनी नेमका कोणता मुद्दा घेऊन कोर्टात जावं, याबद्दल भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Shiv Sena: प्रमोद महाजनांची शिवसेनेबद्दलची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!
उद्धव ठाकरेंना प्रकाश आंबेडकरांनी काय दिला सल्ला?
“निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. त्यांना कोणत्याही परिस्थिती निवडणुका घ्याव्याच लागतात. पण, पक्षामध्ये जे वाद होतात, त्या वादावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का? हा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना सुप्रीम कोर्टात गेली तर त्यांना न्याय मिळेल. त्यांनी याचिका दाखल करावी, असा माझा सल्ला आहे”, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT