Shiv Sena: ‘धनुष्यबाण’ गेला, ‘मशाल’ही जाणार?, ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sena Symbol। Bow and Arrow। Uddhav Thackeray। Eknath Shinde। flaming torch।Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर एकनाथ शिंदेंना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मिळवण्यातही यश आलं. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह दिलं. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंसमोर अनेक आव्हान उभी ठाकली असून, त्यात एक आव्हान असणार आहे, पक्षाचं नाव आणि चिन्हाचं. कारण आता प्रश्न निर्माण होतोय तो ठाकरेंना निवडणूक आयोगाने दिलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह राहणार का?

ADVERTISEMENT

गेल्या नऊ महिन्यांपासून शिवसेना कुणाची हा वाद सुरू होता. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पडदा पडला. केंद्रीय निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्टचा निकष लावत, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बहुमत असल्याचं सांगत त्यांचा शिवसेनेवरील दावा मान्य केला.

शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंसमोर अनेक प्रश्न असून, त्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, धनुष्यबाण निवडणूक चिन्हानंतर अलिकडेच दिलेलं मशाल चिन्हही जाणार का?

हे वाचलं का?

Shiv Sena: प्रमोद महाजनांची शिवसेनेबद्दलची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाव आणि मशाल चिन्ह राहणार की जाणार?

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. पण, मूळ मुद्दा आहे तो उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने दिलेलं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह राहणार का?

ADVERTISEMENT

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना वादावर निकाल देताना यासंदर्भात काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. यात एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आलेलं बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह गोठवलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेलं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे चिन्ह पोटनिवडणुकीपर्यंत असेल, असं स्पष्ट केलं आहे.

shiv sena symbol: पक्ष, चिन्ह गेलं! ठाकरेंचा पुढच्या लढाई निर्णय ठरला!

ADVERTISEMENT

ठाकरेंना शिवसेना हा शब्द वापरता येणार का?

निवडणूक आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीपर्यंत शिवसेना (UBT) नाव आणि मशाल चिन्ह ठाकरेंकडे असणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यानंतर निवडणूक आयोगाकडे नव्याने पक्षाची नोंदणी करावी लागणार आहे.

उद्धव ठाकरेंनी नोंदणी केल्यानंतर हेच नाव मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण सुरुवातीलाच शिवसेना हे वापरता येऊ शकणार नाही. मात्र, सुरुवातीला वेगळा शब्द आणि नंतर शिवसेना हा शब्द घेऊ येऊ शकेल. काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर समाजवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशाच पद्धतीने ठाकरेंना सुरुवातीला दुसरं नाव वापरून शेवटी शिवसेना हे नाव वापरता येऊ शकेल.

shiv sena Symbol: शिवसेना भवनही एकनाथ शिंदेंच्या ताब्यात जाणार का?

मशाल चिन्ह परत घेण्याची मागणी

दरम्यान, शिवसेना वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर आता ठाकरेंकडे असलेलं मशाल चिन्ह चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच असणार आहे. त्यानंतर ठाकरे त्यावर नव्याने दावा करू शकतात. मात्र, समाजवादी पार्टीने पुन्हा एकदा या चिन्हावर दावा ठोकला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT