Shiv Sena पक्ष अन् चिन्ह गेलं! युवासेना, सेनाभवन कुणाकडे.. ‘सामना’ कुणाचा?

मुंबई तक

Who will own Sena Bhavan and Saamana news paper: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Bow and arrow Symbol) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातातून गेल्यानंतर आता बरेच प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं (CM Eknath Shinde) शिवसेनेची कमांड गेल्यानंतर आता युवासेनेचं (Yuva sena) काय होणार? शिवसेना शाखांचं काय होणार शिवसेना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Who will own Sena Bhavan and Saamana news paper: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Bow and arrow Symbol) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातातून गेल्यानंतर आता बरेच प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडू लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं (CM Eknath Shinde) शिवसेनेची कमांड गेल्यानंतर आता युवासेनेचं (Yuva sena) काय होणार? शिवसेना शाखांचं काय होणार शिवसेना भवन, सामना मुखपत्र या सगळ्या गोष्टी कुणाकडे राहणार असे एक ना अनेक सवाल निर्माण झाले आहेत. ज्याची चर्चा देखील होत आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. (uddhav thackeray loses shiv sena party and symbol now who will own sena bhavan and saamana news paper)

निवडणूक आयोगाने शिंदेंच्या पदरात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण टाकलंय. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट न्यायालयात आव्हान देणार आहे. मात्र सध्या तरी शिंदे गटाकडे हा ताबा आहे आणि भविष्यातही राहील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशात आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे युवासेना आणि विविध आघाड्यांचं काय होणार?

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार युवासेना आणि बाकीच्या आघाड्या देखील शिवसेनेसोबत शिंदेंच्या नियंत्रणात राहतील. निवडणूक आयोगाच्या निर्णयातच सांगितलं आहे की, 2018च्या तरतुदीत सुधारणा करावी. त्यामुळं आता ठाकरेंना पक्षाच्या नावांसह आघाड्यांची नाव देखील बदलावी लागतील, असं अभय देशपांडे सांगतात.

अभय देशपांडे सांगतात की, शाखांसंदर्भात बोलायचं झालं तर शिवसेना पक्षाच्या मालकीच्या शाखा या शिंदेंच्या कंट्रोलखाली असतील तर ज्या शाखा वैयक्तिक जागांवर आहेत, त्याचा अधिकार मात्र संबंधितांकडेच असेल. मुंबईतलं सांगायचं झालं तर बहुतांश शाखा अनधिकृत असून स्थानिक शिवसैनिकाकडून त्या चालवल्या जातात. यातील काही शाखा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळू शकतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp