Shiv Sena: ‘बाळासाहेबांच्या फोटोची कॉपी करण्यापेक्षा…’, भाजपचा ठाकरेंवर हल्ला
BJP Leader Chandrashekhar Bawankule attacks on Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पारड्यात टाकली. त्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून, शनिवारी (18 फेब्रुवारी) मुंबईतील कलानगर येथील चौकात त्यांनी गाडीत उभं राहून समर्थकांना संबोधित केलं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा गाडीवर उभं राहुन भाषण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्य […]
ADVERTISEMENT

BJP Leader Chandrashekhar Bawankule attacks on Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पारड्यात टाकली. त्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून, शनिवारी (18 फेब्रुवारी) मुंबईतील कलानगर येथील चौकात त्यांनी गाडीत उभं राहून समर्थकांना संबोधित केलं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंचा गाडीवर उभं राहुन भाषण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्तांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी गाडीत उभं राहून त्यांच्या समर्थकांना संबोधित केलं. ठाकरेंच्या भाषणानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो व्हायरल आणि त्यानंतर बावनकुळेंनी ठाकरेंना टोले लगावले.
आमचं कवच एकच…
तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद! pic.twitter.com/qTV6Xk03rb— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 18, 2023
Devendra Fadnavis: पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात: फडणवीस
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उद्धवजी बाळासाहेबांच्या विचारांची कॉपी करा. गेल्या अडीच वर्षांत सरकार चालवण्यासाठी तुम्ही कधी घराबाहेर पडला नाहीत आणि आज कारच्या सनरूफचा आधार घेत मातोश्रीच्या बाहेर पडून भाषण करत आहात. पण बाळासाहेबांच्या फोटोची कॉपी करण्यापेक्षा त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांची कॉपी करा”, असा खोचक टोला बावनकुळेंनी ठाकरेंना लगावला आहे.