शीतल म्हात्रेंच्या Viral व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावरून शीतल म्हात्रे आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. हा व्हिडीओ व्हायरल होताच शीतल म्हात्रे यांनी तात्काळ मीडियासमोर येऊन आपलं म्हणणं माडलं होतं. हा व्हिडिओ खोडसाळपणे तयार करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ज्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन ते चार जणांना अटक केली होती. मात्र, या सगळ्या प्रकरणात प्रकाश सुर्वे हे काही माध्यमांसमोर आले नव्हते. मात्र, आता याबाबत त्यांनी आपलं म्हणणं एका पत्राच्या माध्यमातून मांडलं आहे. (shiv sena mla prakash surve left silence on sheetal mhatre viral video wrote a public letter)

ADVERTISEMENT

‘मला बहिणीसमान असणाऱ्या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकेतेमधून हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला.’ असं म्हणत प्रकाश सुर्वे यांनी देखील व्हायरल व्हिडीओ मॉर्फ असल्याचा दावा केला आहे. पाहा प्रकाश सुर्वेंनी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय.

प्रकाश सुर्वेंचं पत्र जसंच्या तसं:

सध्या श्री. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्या मतदार संघात जोमाने सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या धडाक्यामुले स्वत:च्या राजकीय जीवनात हताश झालेले विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी लोकप्रल्पांच्या कामांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरिता व्हिडीओ मॉर्फ करणे, चारित्रहननन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. यामधून त्यांचे राजकीय नैराश्य दिसून येते, सर्वसामान्य लोकांना मात्र त्यांच्यासाठी 24 तास लोकांमध्ये राहून काम करणारे लोकप्रतिनिधी आवडतात आणि लोक त्यांच्यामागे उभे राहतात हा माझा अनुभव आहे.

हे वाचलं का?

दिनांक 11.03.2023 रोजी लोकप्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर हजारो लोकांच्या गर्दीच्या उपस्थितीत मा. एकनाथ शिंदे साहेब यांची रॅली झाली. यावेळी प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणीसमान असणाऱ्या माजी नगरसेविका सौ. शीतल म्हात्रे मला या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाच्या व्हिडीओमध्ये चुकीचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकेतेमधून हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला. अशाप्रकारचे कृत्य हे हा व्हिडीओ बनविणाऱ्यांची महिलांच्या प्रति असलेली ही मानसिकता दाखवून देते.

sheetal Mhatre : व्हिडीओ व्हायरल, मध्यरात्री रंगलं नाट्य; शीतल म्हात्रे संतापल्या

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची शिकवण उभ्या महाराष्ट्राला दिली आहे हीच शिकवण स्वर्गीय मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही हीच शिकवण अंगीकारली आहे.

ADVERTISEMENT

या बनावट व्हीडिओ प्रकरणात मुंबई पोलिसांनी तडफेने कारवाई करत या षडयंत्राबाबत संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे तपासातून याबाबतचे सत्य समोर येईलच. अशाप्रकारचे व्हिडीओ पसरवून लोकांचे लक्ष विचलीत करता येईल मात्र, लोकांचे मन जिंकण्याकरिता लोकांमध्ये राहून लोकांची कामे करीत राहवी लागतात विरोधक आमच्या कामांमधून लोकांची कामे करण्याची प्रेरणा घेतील असी मी अपेक्षा करतो.

या सर्व प्रकारामुळे माझे कुटुंबीय आणि मला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. ज्या कुणी हा व्हीडिओ बनविला असेल त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

‘त्या’ व्हिडीओ प्रकरणात वादात सापडलेल्या शीतल म्हात्रे कोण?

असं म्हणत प्रकाश सुर्वेंनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. आता यानंतर शिवसेना (UBT)पक्षाचे नेते याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

भाजप-शिवसेना युतीच्या वतीने मुंबईत आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. सहा लोकसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाणार असून, शनिवारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा यात्रेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ मॉर्फिंग करून आणि अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे.

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण : पुण्यातील एका तरुणाला अटक

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT