संतापजनक! शिवसेना आमदाराकडून महिलेला रस्त्यावरच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

मुंबई तक

भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या आमदाराने रस्त्यावर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेनं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे ही घटना घडली. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या आमदाराने रस्त्यावर खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलेनं या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारे यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे ही घटना घडली. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याच्या कारणावरून शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे.

महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, “आमच्या गावात भाजपच्या शाखेचं उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यानंतर आम्ही वैजापूर येथील गोदावरी कॉलनीत एका वर्षश्रद्धाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी भाजपच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरणारे यांच्यासह कुटुंबातील ९ सदस्यांनी मला मारहाण केली. रस्त्यावर खाली पाडून लाथांनी मला मारलं,” असा आरोप महिलेनं केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp