उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे… धनुष्यबाण चिन्हाशिवाय निवडणूक झाल्यास फायदा कोणाला?
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं या वादाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय. आणि निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे दोघांचं बहुमत जोखून निर्णय दिला जाणार आहे. पण हा निर्णय काही लगेच येत नाही. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. दुसरीकडे भारतात निवडणूक ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय होण्याआधीच निवडणूक लागली, तर दोन्ही बाजूंना […]
ADVERTISEMENT

शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचं या वादाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय. आणि निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे दोघांचं बहुमत जोखून निर्णय दिला जाणार आहे. पण हा निर्णय काही लगेच येत नाही. ती दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. दुसरीकडे भारतात निवडणूक ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय होण्याआधीच निवडणूक लागली, तर दोन्ही बाजूंना धनुष्यबाणाशिवाय रिंगणात उतरावं लागेल. त्यामुळे धनुष्यबाणाशिवाय निवडणूक झाली, तर कोणाला फायदा होईल आणि कोणाचा तोटा होईल? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंतल्या संघर्षात धनुष्यबाणावर आता निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. आयोगाच्या चेंडू तीन गोलमध्ये जाऊ शकतो. एक गोल आहे शिंदेंचा, दुसरा गोल आहे ठाकरेंचा आणि तिसऱ्या गोलमध्ये चेंडू गेल्याच सामना ड्रॉ होईल. म्हणजेच धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल.
तिसऱ्या परिस्थितीत निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना दोन वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला जातो. असं झालं, तर मग फायदा उद्धव ठाकरेंचा होईल की एकनाथ शिंदेंचा, असा प्रश्न निर्माण होतो. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात दोन्ही बाजुंची ताकद सारखी होते. एका लायनीत आणण्याचं काम होतं. अशा परिस्थितीत निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी दोन फॅक्टर महत्त्वाचे ठरतात. आणि शिंदे-ठाकरेंमधल्या सत्तासंघर्षात याच दोन फॅक्टरचा बोलबाला आहे.
खरी शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? केंद्रीय निवडणूक आयोग कसं ठरवणार?