Maharashtra Bandh : ‘शिवभोजन थाळी’ देणाऱ्या हॉटेलचीच शिवसैनिकांकडून तोडफोड, चंद्रपुरातली घटना
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ बंदची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी एकत्र या बंदची घोषणा केली. राज्यात आज काही ठिकाणी या बंदला हिंसक वळणही लागलं. सत्ताधारी पक्षातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन दमदाटी आणि हिंसेचा वापर करत दुकानदारांना आपली दुकानं बंद करण्यास भाग पाडलं. […]
ADVERTISEMENT

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर महाराष्ट्रात या घटनेच्या निषेधार्थ बंदची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी एकत्र या बंदची घोषणा केली. राज्यात आज काही ठिकाणी या बंदला हिंसक वळणही लागलं. सत्ताधारी पक्षातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन दमदाटी आणि हिंसेचा वापर करत दुकानदारांना आपली दुकानं बंद करण्यास भाग पाडलं.
चंद्रपुरात शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शिवभोजन थाळीलाही याचा फटका बसला आहे. आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी शिवभोजन थाळी पुरवणाऱ्या हॉटेलची तोडफोड केली आहे.
चंद्रपूरच्या मुख्य बस स्थानकासमोरील शिवभोजन थाळी पुरवणारं हॉटेल आज सुरु होतं. शिवसैनिकांनी या हॉटेलमध्ये शिरुन सामानाची नासधुस करत तोडफोड केली. तयार झालेले खाद्यपदार्थ आणि काही काचेच सामान फोडत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. इतकच नव्हे तर शिवभोजन थाळीच्या फलकाचीही शिवसैनिकांनी नासधूस केली.
Maharashtra Bandh: शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेनेची फरफट, आजचा बंद फसला – चंद्रकांत पाटील