केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारं, शिवसेनेची घणाघाती टीका
नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष जरा जास्त तीव्र झालेला पाहण्यास मिळतो आहे. त्याआधी किरीट सोमय्यांच्या आरोपांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण चालवले. आता शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रोज पाहण्यास मिळतो आहे. सामनाच्या अग्रलेखातून आजही भाजपवर टीका करण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष जरा जास्त तीव्र झालेला पाहण्यास मिळतो आहे. त्याआधी किरीट सोमय्यांच्या आरोपांना संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यावर टीकेचे बाण चालवले. आता शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना रोज पाहण्यास मिळतो आहे. सामनाच्या अग्रलेखातून आजही भाजपवर टीका करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडीच्या हातातील हत्यारे झाली आहेत असा उल्लेख आज सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.
उद्या महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, संजय राऊत यांची जळजळीत टीका
काय म्हटलं आहे अग्रलेखात?
भाजपने म्हणे भ्रष्टाचाराविरोधात युद्ध पुकारले आहे. रशिया युक्रेनचे युद्ध सुरू आहे सगळ्यांना माहित आहे. पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे ते भ्रष्टाचारविरूद्ध. केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध म्हणत असतील ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आड लपून लोक युद्धाचा आव आणत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे.










