शिंदे-ठाकरे दसरा मेळावा : ऐन सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मैदानाचा वाद मिटल्यानंतर शिंदे-ठाकरे गटाने जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही दोन्ही गटांचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय एसटी बसेसचेही ग्रुप बुकिंग करण्यासाठी आमदार, पदाधिकारी सज्ज झाले आहेत. मात्र या मेळाव्यांमुळेच ऐन सणासुदीच्या […]
ADVERTISEMENT
मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मैदानाचा वाद मिटल्यानंतर शिंदे-ठाकरे गटाने जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही दोन्ही गटांचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय एसटी बसेसचेही ग्रुप बुकिंग करण्यासाठी आमदार, पदाधिकारी सज्ज झाले आहेत.
मात्र या मेळाव्यांमुळेच ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी एसटी महामंडळाकडे ४ हजार १०० गाड्यांसाठी विचारणा करण्यात आली आहे. याशिवाय ठाकरे गटाकडूनही मोठ्या प्रमाणावर एसटी बुकिंग करण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. मात्र यामुळे एसटीच्या नियमित वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्ह आहेत.
ऐन सणाच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने गाड्या आरक्षित केल्यास नियमित वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते, अशी चिंता एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सध्या एसटी महामंडळाच्या 15 हजार 500 गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यातील 4 ते 6 हजार गाड्या शिंदे आणि ठाकरे गटाकडून बुक झाल्यास त्याचा फटका नियमित प्रवासी वाहतुकीला बसू शकतो. त्यामुळे सणाला घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
केवळ पार्किंगसाठी 10 मैदानं बुक
दरम्यान, या मेळाव्यासाठी येणाऱ्या केवळ गाड्यांच्या पार्किंगसाठी शिंदे गटाकडून बीकेसी मैदानाच्या आसपासची दहा मैदानं बुक केलेली आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. बुधवारी सायंकाळी शिंदे गटाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
यावेळी शिंदे म्हणाले, आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. मेळाव्यासाठी साधारणतः अडीच ते तीन लाख लोकं येण्याची शक्यता आहे. या गाड्यांसाठी आसपासची दहा मैदानं बुक केलेली आहेत. अनेक जण आपल्यासोबत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्याला होतील. जे कार्यकर्ते येतील त्यांची जेवणाची, पाण्याची आणि वॅाशरुमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT