कोकणात नेमका ‘आवाज कुणाचा’? : शिंदे गटाने केली आदित्य ठाकरेंना उत्तर देण्याची तयारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रत्नागिती : शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारी कोकण दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते रत्नागिती, दापोली, चिपळूण असा भाग पिंजून काढणार आहेत. याठिकाणी ते सभा घेवून बंडखोरी केलेल्या मंत्री उदय सामंत आणि माजी मंत्री रामदास कदम या नेत्यांच्या विरोधात कोकणात वातावरण तापविण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतील सावळे स्टॉपजवळील जलतरण तलावाजवळ त्यांची जवळपास 15 हजार शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सभा होणार असल्याची माहिती राजन साळवी यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या 2 दिवसांतच शिंदे गटाकडूनही उत्तर देण्याची तयारी करण्यात येत आहे. रविवारी (18 सप्टेंबर) रोजी ठाकरेंचा मेळावा होणाऱ्या ठिकाणीच मेळावा घेण्याचे नियोजन एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आले आहे. या मेळाव्याला रामदास कदम, उदय सामंत आणि आमदार योगेश कदम उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास कदम व योगेश कदम यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आदेश दिले आहेत.

सामंत-कदमांची कुंडली काढण्याचे जाधव अन् दळवींचे आव्हान

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान उदय सामंत आणि रामदास कदम यांची कुंडली काढण्याचे आव्हान शिवसेना नेते, आमदार रामदास कदम आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी दिले आहे. सोळा तारखेला आदित्य ठाकरे रत्नागिरीला येणार आहेत, त्यांच्याच उपस्थिती उदय सामंत काय आहे हे सांगणार, असे आव्हान जाधव यांनी दिले.

हे वाचलं का?

तर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात रामदास कदम आणि योगेश कदम यांनी केलेल्या गद्दारीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा सूर्यकांत दळवी यांनी दिला आहे. सध्या राजकारणात उलथापालथ झाल्याच्या घटना घडल्या आहेत, त्याचा समाचार घेण्यासाठी आणि बंडखोरीची कीड गाडण्याचं आव्हान आदित्य ठाकरे यांनी स्वीकारलं आहे, असेही दळवी म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT