नाराळावरची कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीशी बरोबरी केल्याचं दाखवायचं – शंभुराज देसाईंचा राणेंना टोला
काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं कडवं आव्हान मोडून काढत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पॅनलने बाजी मारली. ११ विरुद्ध ८ अशा फरकाने पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर नारायण राणेंचीच सत्ता असणार आहे. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाविकास आघाडीसह शिवसेनेवर जोरदार टीका केली. सोशल मीडियावरही नारायण राणे समर्थकांनी एक कार्टून […]
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचं कडवं आव्हान मोडून काढत केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या पॅनलने बाजी मारली. ११ विरुद्ध ८ अशा फरकाने पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर नारायण राणेंचीच सत्ता असणार आहे. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी महाविकास आघाडीसह शिवसेनेवर जोरदार टीका केली.
सोशल मीडियावरही नारायण राणे समर्थकांनी एक कार्टून शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे. वाघाची शेपटी हातात धरुन त्याला बँकेत जाण्यापासून नारायण राणे रोखत असल्याचं या चित्रात दाखवलं आहे. शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी यावरुन राणेंना चांगलाच टोला लगावला आहे.
“पूर्वी नाराळावरच्या कुस्त्या व्हायच्या. बत्ताशावरचे पैलवान असायचे. हे असंच आहे, नाराळावरची कुस्ती जिंकायची आणि हिंदकेसरीशी बरोबरी केल्याचं दाखवायचं. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादीत स्वरुपाच्या असतात. जनमताचा कौल घ्यायचा असेल तर नारायण राणेंनी पुढे यावं म्हणजे त्यांना कोकणातली शिवसेना काय आहे हे कळेल.”
एका हाती पोस्टर एका हाती गम घेऊन महाराष्ट्रात फिरा, तीच तुमची लायकी; नारायण राणेंनी शिवसेनेला सुनावलं