पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेणाऱ्यांच्या मुलांना तिकीटासाठी भीक मागावी लागते- राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई तक

गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकरला तिकीट नाकारण्यात आल्याच्या निर्णयावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. आजच्या सामना अग्रलेखात उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारताना घराणेशाहीचा निकष लावणाऱ्या भाजपवर शिवसेनेने टीका केली आहे. यानंतर आज मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी ज्या मनोहर पर्रिकरांनी गोव्यात पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गोवा विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकरला तिकीट नाकारण्यात आल्याच्या निर्णयावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. आजच्या सामना अग्रलेखात उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारताना घराणेशाहीचा निकष लावणाऱ्या भाजपवर शिवसेनेने टीका केली आहे. यानंतर आज मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी ज्या मनोहर पर्रिकरांनी गोव्यात पक्ष वाढवण्यासाठी कष्ट घेतले, त्यांच्यात मुलाला तिकीटासाठी भाजपच्या दारात भिक मागण्याची वेळ आली असं म्हणत टीका केली आहे.

उत्पल पर्रिकरांना पणजीसाठी मी योग्य उमेदवार आहे हे कन्विन्स करावं लागतंय. कदाचीत याचमुळे त्यांनी भाजपचा त्याग केला आहे. ज्या पक्षात आपला जन्म झाला तो पक्ष सोडताना वेदना होतात, त्यांच्या चेहऱ्यावर मी या वेदना अनुभवल्या आहेत. आमच्या उत्पल पर्रिकरांना शुभेच्छा आहेत. मनोहर पर्रिकरांमुळे गोव्याचं नाव देशात गाजलं. राजकारणं कसं असावं याचा वस्तुपाठ मनोहर पर्रिकरांनी घालून दिला होता.

उत्पल पर्रिकरांची बंडखोरी, सामना मधून शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र; काँग्रेसलाही टोमणे

परंतू ज्या पद्धतीने त्यांच्या मुलाला वागणूक मिळते आहे ते गोव्याच्या जनतेला आवडलं नाही. आता ते अपक्ष लढणार आहेत. आताची लढाई ही बेईमानी विरुद्ध चारित्र्यवान नेता अशी होणार आहे. ज्या पणजीचं नेतृत्व मनोहर पर्रिकरांनी केलं तिकडे भाजपने असा उमेदवार दिला आहे की त्याच्यावर भ्रष्टाचार, माफीयागिरी, बलात्कार असे गंभीर आरोप आहेत. असा उमेदवार भाजपचा चेहरा बनून गोव्यात उभा आहे. अशा उमेदवाराचा प्रचार करायला मोदी आणि शहा गोव्यात येतील. देवेंद्र फडणवीस तर गोव्यातच तळ ठोकून आहेत. त्यामुळे ही लढत खूप चांगली होणार आहे, आमच्या उत्पल पर्रिकरांना शुभेच्छा असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.

माझ्या भवितव्याची चिंता करु नका, मनात भाजप कायम – उत्पल पर्रिकरांनी इतर पक्षांच्या ऑफर धुडकावल्या

भारतीय जनता पार्टीने ज्या ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली त्या सर्वांचं कॅरेक्टर सर्टिफीकेट शिवसेनेजवळ आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासारख्या नेत्यांनी गोव्यात भाजपची बीजं रोवली. हे सर्व चारित्र्यवान कार्यकर्ते होते. आज ते देखील म्हणत आहेत की आम्ही पैसे देऊ शकलो नाहीत म्हणून आमची उमेदवारी नाकारण्यात आली, हे दुर्दैवी असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp