संजय राऊत मित्र परिवाराचा 100 कोटींचा जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत भागिदार असलेली लाइफलाइन हॉस्पिटल ही मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनी अस्तित्त्वातच नाही. तरीही कोव्हिड सेंटरचं कंत्राट या कंपनीला देऊन 100 कोटींचा जंबो कोव्हिड घोटाळा करण्यात आला आहे असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

काय आहे किरीट सोमय्यांचं ट्विट?

शिवसेना खासदार संजय राऊत यांची भागिदारी असलेली सुजीत पाटकर यांची बनावट कंपनी आहे. लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनीच अस्तित्वात नाही. परंतु या कंपनीला दहिसर, वरळी NSCI,महालक्ष्मी रेसकोर्स, मुलुंड आणि पुण्यातील कोविड सेंटरचे कंत्राट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये अनेक कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून या कंपनीने शंभर कोटी रूपयांचा जम्बो कोविड घोटाळा केला आहे. असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आम्हाला चँलेंज करणारे किरीट सोमय्या कोण’, रोहित पवारांचा सवाल

आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे अशीही मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

गेल्या महिन्यातही किरीट सोमय्यांनी अशाच पद्धतीने आरोप केला होता. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढली असली तरीही कोव्हिड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी 800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून कोरोनाच्या नावाखाली घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कारण कोव्हिड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT