नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म आणि लघू उद्योग, सरकार पाडणं मोठा उद्योग; संजय राऊत यांचा टोला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचं सरकार स्थापन होईल असं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या रोखठोक शैलीत नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला उत्तर दिलं आहे. तसंच हे सरकार पाच वर्षे चालणार आहे त्याला […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्यात भाजपचं सरकार स्थापन होईल असं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत आता प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खास आपल्या रोखठोक शैलीत नारायण राणेंनी केलेल्या दाव्याला उत्तर दिलं आहे. तसंच हे सरकार पाच वर्षे चालणार आहे त्याला कोणताही धोका नाही हे पुन्हा एकदा सांगितलं आहे.
एसटी संप असो की अमरावती घटना हे सगळे महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न-संजय राऊत
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्रात वेगवान घडामोडी घडत आहेत असं काही आम्हाला तरी वाटत नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग हे खातं त्यांच्याकडे आहे. नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत. ते आमचे विरोधी असले तरीही मी हे सांगेन की ते मंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. कारण एक मराठी माणूस हे काम करतो आहे. मात्र महाराष्ट्राचं सरकार पाडणं हा सूक्ष्म किंवा लघू उद्योग नाही. तो मोठा उद्योग आहे. त्यामुळे नारायण राणे जे काही म्हणतात त्यात तथ्य नाही.