Uddhav Thackeray यांची उरलेल्या १५ आमदारांना भावनिक साद, पत्र लिहित म्हणाले…
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोबत राहिलेल्या १५ आमदारांना आता भावनिक साद घातली आहे. एक पत्र लिहून त्यांनी हे आवाहन केलं आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट ही लढाई सुरू आहे. अशात या भावनिक पत्राची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रात? शिवसेना हा आपला […]
ADVERTISEMENT

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोबत राहिलेल्या १५ आमदारांना आता भावनिक साद घातली आहे. एक पत्र लिहून त्यांनी हे आवाहन केलं आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट ही लढाई सुरू आहे. अशात या भावनिक पत्राची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी पत्रात?
शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करू नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्मानीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत आणि वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या किंवा प्रलोभनांना बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात. आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला आणि शिवसेनेला बळ मिळाले. आई जगदंबा आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य देवो.
आपला नम्र










