धक्कादायक.. पुण्यात पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा काढला काटा
पुणे: पुण्याच्या कात्रज परिसरात पत्नीने आपल्या पोटच्या मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह लोखंडी पाइपला लटकवून पतीने आत्महत्या केली असा बनाव देखील रचला. प्रकाश किसन जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी पत्नी शालन जाधव तर मुलगा हा अल्पवयीन आहे. प्रकाश जाधव […]
ADVERTISEMENT

पुणे: पुण्याच्या कात्रज परिसरात पत्नीने आपल्या पोटच्या मुलाच्या मदतीने पतीचा काटा काढला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने त्याचा मृतदेह लोखंडी पाइपला लटकवून पतीने आत्महत्या केली असा बनाव देखील रचला.
प्रकाश किसन जाधव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी पत्नी शालन जाधव तर मुलगा हा अल्पवयीन आहे. प्रकाश जाधव हे त्यांच्या पत्नीवर नेहमीच संशय घेत होते. त्यामुळे या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत होती.
घटनेच्या दिवशी ही अशीच भांडणे विकोपाला गेल्याने पत्नी आपल्या मुलाच्या साथीने पतीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत प्रकाश जाधवचा मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या शालन जाधव हिने पतीचा मृतदेह पाइपला लटकवला.
दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांना प्रकाश जाधव नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकाश जाधवचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला.










