Guhagar: धक्कादायक, जेली चॉकलेटमुळे बालकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jelly chocolate stuck in throat childs unfortunate death: रत्नागिरी: गुहागर (Guhagar) तालुक्यात एका 9 महिन्याच्या मुलाचा अत्यंत विचित्र पद्धतीने मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर तालुक्यातील साखरीआगर कातळवाडी येथील एका घरात एक 9 महिन्याचं बालक हे जमिनीवर खेळत होतं. त्याचवेळी जमिनीवर पडलेलं जेली चॉकलेट (jelly chocolate) उचलून त्याने थेट तोंडात टाकली. जे त्या बालकाच्या घशात अडकलं आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. (shocking incident in guhagar 9 month old childs unfortunate death after jelly chocolate stuck in throat)

ADVERTISEMENT

दरम्यान, ही घटना बुधवारी (25 जानेवारी) घडली असून याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात शुक्रवारी नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

साखरीआगर कातळवाडी येथील प्रमोद तेरेकर यांचे 9 महिन्याचे बाळ बुधवार दिनांक 25 जानेवारी रोजी घरामध्ये खाली जमिनीवर खेळत होतं. याचवेळी त्याला जमिनीवर पडलेलं जेली चॉकलेट दिसलं. जे त्याने उचलून थेट तोंडात टाकलं. अचानक हे चॉकलेट तोंडात घातल्याने ते बाळाच्या घाशामध्ये अडकलं. पण तात्काळ ही बाब घरातील लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे बाळाचा श्वास गुदरमला.

हे वाचलं का?

धक्कादायक… चुकीचे सोनोग्राफी निदान केल्याने गर्भवती महिलेसह बालकाचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा

मात्र, जेव्हा ही बाब त्यांच्या घरातील लोकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी बाळाला तात्काळ दवाखान्यात उपचारसाठी नेलं. मात्र, दवाखान्यात नेतानाच बालकाचं निधन झालं. रिहांश तेरेकर असं मृत बाळाचं नाव असल्याचे समजते आहे.

ADVERTISEMENT

तेरेकर दाम्पत्याचे हे पहिलेच अपत्य होते. काही महिन्यांपूर्वीच बाळाचा जन्म झाल्याने संपूर्ण कुटुंब हे आनंदात होतं. पण अचानक रिहांशचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तेरेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ADVERTISEMENT

रिहांशचे वडील प्रमोद तेरेकर हे नोकरीनिमित्त मुंबईतच राहतात. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा त्यांना तात्काळ कळविण्यात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ गुहागर गाठलं. मात्र, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच ते पूर्णपणे कोलमडून गेले.

Mahad Death: लसीकरणानंतर काही तासाने बालकाचा मृत्यू; आई-वडिलांचा आरोप

दरम्यान, याप्रकरणी गुहागर पोलिसांनी फिर्याद देखील दाखल केली असून त्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार कांबळे करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT