‘जबरदस्तीने ड्रग्ज दिलं अन् नंतर…’; सोनाली फोगाटच्या मृत्यूबद्दल गोवा पोलिसांचा खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोनाली फोगाटच्या मृत्यूप्रकरणी आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सांगितले की, सोनालीला ड्रग्ज देण्यात आले होते. चौकशी दरम्यान पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाटला जबरदस्तीने ड्रग्ज देण्यात आले होते. सोनाली फोगाटच्या मृत्यूनंतर तिच्या भावाच्या जबाबाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची चौकशी करण्यात आली.

ADVERTISEMENT

सोनाली फोगाटच्या मृत्यूनंतर तिच्या भावाच्या जबाबाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची चौकशी करण्यात आली. उपलब्ध पुराव्याच्या आधारे सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सोनालीसोबत पार्टी करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत आहे. सोनालीला बळजबरीने काहीतरी देण्यात आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सांगवानची चौकशी केली असता, त्याने सोनालीला जबरदस्तीने ड्रिंक्समध्ये अंमली पदार्थ किंवा ड्रग्ज सदृश्य पदार्थ मिसळून पाजल्याची कबुली दिली.

सोनाली फोगाटला दोन तास बाथरूममध्ये ठेवले

सोनालीला ड्रग्स दिल्यानंतर ती नियंत्रणात राहिली नाही. त्यानंतर या दोघांनी तिची काळजी घेतली. दुपारी 4.30 च्या सुमारास, जेव्हा त्यांना तिला सांभाळता आले नाही तेव्हा ते तिला बाथरूमच्या दिशेने घेऊन गेले. ते लोक दोन तास बाथरूममध्ये होते. त्याचे स्पष्टीकरण आरोपींनी दिलेले नाही. प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी गुन्हेगार असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडे पुढील तपास करण्यात येणार आहे. दुसरीकडे, सोनाली फोगाटच्या अंगावरील जखमाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, या गंभीर जखमामुळे तिच्या मृत्यूचं कारण नाहीत. मृतदेह उचलताना दुखापत झाल्याचं आरोपींनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

ड्रग्ज दिल्याचं सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंगने दिली कबुली

गोव्याचे पोलीस महानिरीक्षक म्हणाले, आम्ही पीडित महिला आणि आरोपी ज्या ठिकाणी गेले आहेत, त्याची चौकशी करत आहोत. आम्ही आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. आम्हाला करी क्लबकडून सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. आरोपी सुधीर आणि सुखविंदर सिंग पार्टी करत होते. व्हिडिओमधून आम्ही पाहिले की एक आरोपी पीडितेला जबरदस्तीनं काहीतरी प्यायला देत आहेत. आरोपींनी पीडितेला काहीतरी प्यायला दिल्याचं कबूल केलं आहे.

सिंथेटिक ड्रगचा वापर केल्याचा दावा

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सोनालीच्या ड्रिंकमध्ये सिंथेटिक ड्रगचा वापर केल्याचे सांगितले. परंतु त्यांनी त्याऔषधाचे नाव सांगितलेले नाही. तिने काय प्यायले याबाबत अधिक चौकशी केली जाईल, असे आयजीपींनी सांगितले. फॉरेन्सिकसायन्स लॅबमधील तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

आरोपींशी संबंधित पुरावे त्यांना देण्यात आले आहेत. आतापासून २४तासांच्या आत पोलीस आरोपींना न्यायालयासमोर हजर करणार आहेत. या प्रकरणात आरोपीचे काही आर्थिक हितसंबंध असल्याचेही चौकशीदरम्यान समोर आले आहे. आयजीपी म्हणाले की असे दिसते की मृत्यूचे मुख्य कारण औषध होते. मुंबईहून एक ग्रुप येणार होता. त्यांना सोनालीसोबत काही व्हिडिओ रेकॉर्ड करायचे होते. याप्रकरणी टॅक्सी चालकाचा जबाबही नोंदवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT