Jalgaon च्या Shivsena उपमहापौरांवर गोळीबार, क्रिकेटच्या वादातून हल्ला

मुंबई तक

जळगावचे शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांनी कारने पाठलाग करून गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी कुलभूषण पाटील यांचा पाठलाग करताना एक, तर त्यांच्या पिंप्राळा परिसरातील घराजवळ तीन असे चार राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील बचावले आहेत. क्रिकेट खेळताना दोन गटात झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जळगावचे शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांनी कारने पाठलाग करून गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी कुलभूषण पाटील यांचा पाठलाग करताना एक, तर त्यांच्या पिंप्राळा परिसरातील घराजवळ तीन असे चार राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील बचावले आहेत. क्रिकेट खेळताना दोन गटात झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून उपमहापौर पाटील यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात 4 ते 5 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गट परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा या वादात मध्यस्थी करण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील हे गेले होते. त्यांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांनी एकाच गटाची बाजू घेतल्याचा आरोप करून त्यांना काही तरुणांनी शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास कुलभूषण पाटील हे त्यांचे सहकारी अनिल यादव यांच्यासह आपल्या संपर्क कार्यालयातून घरी दुचाकीने जात होते.

तेव्हा कारने त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाटील यांनी घराच्या दिशेने दुचाकी पळवली. त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्यावर हल्लेखोरांनी पुन्हा 3 राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील हे बचावले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp