Shraddha Walkar : आफताबला फाशी झाली पाहिजे, श्रद्धाच्या वडिलांची आर्त मागणी
माझ्या मुलीची ज्या आफताबने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली त्या आफताबला फाशी झाली पाहिजे आणि श्रद्धाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. आज विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसंच भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्रद्धाच्या वडिलांनी ही […]
ADVERTISEMENT

माझ्या मुलीची ज्या आफताबने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली त्या आफताबला फाशी झाली पाहिजे आणि श्रद्धाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी केली आहे. आज विकास वालकर यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसंच भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्रद्धाच्या वडिलांनी ही आर्त मागणी केली आहे.
काय म्हटलं आहे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी?
माझी मुलगी श्रद्धा वालकरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. मला दिल्ली पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की तुम्हाला न्याय मिळेल. मी आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. डॉ. नीलम गोऱ्हे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही माझी चौकशी केली. माझी अशी मागणी आहे की माझ्या मुलीसोबत जे काही झालं आहे त्याबाबत मला न्याय मिळावा. आफताबला फाशी झाली पाहिजे अशी मी मागणी करतो आहे.
माझ्या कुटुंबावर खूप मोठा आघात
जी घटना माझ्या मुलीच्या बाबतीत झाली तिचा मृत्यू झाला. त्यामुळे आमच्या कुटुंबावर आघात झाला आहे. माझी प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे मी फार बोलणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या तपासाबाबत दिल्ली आणि वसई पोलिसांचं काम व्यवस्थित सुरू आहे. वसईतल्या तुळींज पोलीस स्टेशन आणि माणिकपूर पोलीस स्टेशन यांनी सुरूवातीला असहकार्य दाखवलं. त्याची चौकशी व्हावी कारण तसं झालं नसतं तर आज श्रद्धा जिवंत असती असं मला वाटतं. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे.