Sidhu Moose Wala च्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; लॉरेन्स बिश्नोई गँगची ‘ती’ खेळी फसली
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. सिद्ध मुसेवालाच्या हत्येसाठी ८ शार्प शूटर्स बोलावण्यात आले होते. यात दोन शार्प शूटर्स हे पुण्यातील असल्याचं समोर आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांनी तशी माहिती पंजाब पोलिसांना दिलीये. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे असलेल्या संशयित ८ शूटर्सची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या […]
ADVERTISEMENT

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. सिद्ध मुसेवालाच्या हत्येसाठी ८ शार्प शूटर्स बोलावण्यात आले होते. यात दोन शार्प शूटर्स हे पुण्यातील असल्याचं समोर आलंय. पुणे ग्रामीण पोलिसांनी तशी माहिती पंजाब पोलिसांना दिलीये.
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमागे असलेल्या संशयित ८ शूटर्सची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात मनप्रीत सिंग मन्नू याला अटक करण्यात आलेली असून, ३ शूटर्स पंजाबमधीलच आहेत. २ महाराष्ट्र, २ हरयाणा आणि एक शूटर राजस्थानातील असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
मारेकऱ्यांनी सिद्धू मुसेवालाची अक्षरशः केली चाळण, शरीरातून मिळाल्या तब्बल दोन डझन गोळ्या
सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणातील शूटर्सचा आता पोलिसांकडून शोध घेतला जात असून, पुणे ग्रामीण पोलिसही सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानात पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.