सिद्धू मुसेवाला हत्या : पुणे पोलीस संतोष जाधवच्या मागावर; शोधताहेत गँग कनेक्शन

मुंबई तक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून याचा धांडोळा घेतला जात आहे. पोलिसांना दोघांवर संशय असून, यातील संतोष जाधवचे काही फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात एक फोटो अरुण गवळीच्या संबंधित आहे. आता पोलीस त्या अनुषंगानेही तपास करत आहेत. पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची गोळ्या घालून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून याचा धांडोळा घेतला जात आहे. पोलिसांना दोघांवर संशय असून, यातील संतोष जाधवचे काही फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात एक फोटो अरुण गवळीच्या संबंधित आहे. आता पोलीस त्या अनुषंगानेही तपास करत आहेत.

पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येचा तपास सध्या केला जात असून, सीसीटीव्हीत काही संशयित आरोपी आढळून आले आहेत. यात दोन जण पुण्यातील असून, सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव यांच्यावर पोलिसांना संशय आहे.

Sidhu Moose Wala Death: दिल्लीच्या तिहार तुरुंगातच रचण्यात आला सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट

सीसीटीव्हीच्या आधारे पुणे पोलिसांनी संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ याची ओळख पटवली आहे. त्यामुळे सिद्धू मुसेवालावर हल्ला करणाऱ्या शूटर्सचा शोध दिल्लीपासून पुण्यापर्यंत घेतला जात आहे. पुणे पोलिसांकडून संतोष जाधव आणि सौरभ महाकाळची माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली आहे.

आता पोलिसांच्या हाती संतोष जाधवचे काही जुने फोटो लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मंचर गावचा आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी संबंधित माहिती पंजाब पोलिसांनी पुणे पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पुणे पोलीस आता शोध घेत आहेत.

Sidhu Moose Wala च्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; लॉरेन्स बिश्नोई गँगची ‘ती’ खेळी फसली

पोलिसांच्या माहितीनुसार संतोष जाधवच्या विरुद्ध एका हत्येचा गुन्हा खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. त्याचबरोबर अनेक गुन्हेगार संतोष जाधवच्या संपर्कात असल्याचीही माहिती पोलिसांना प्राथमिक तपासातून मिळाली आहे. त्यामुळे पोलीस संतोष जाधवच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करणार आहेत.

संतोष जाधवबद्दलची माहिती पोलिसांकडून गोळा केली जात आहे. पोलिसांना आता संतोष जाधवचे काही फोटो मिळाले आहेत. यात संतोष जाधवचे किशोरवयातील फोटोही आहेत. यातीलच एका फोटोमध्ये संतोष जाधव अरुण गवळीच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत दिसत आहे.

Sidhu Moose Wala वर गोळ्या झाडणाऱ्या पुण्यातल्या संतोष जाधवची आई म्हणते……

आशा गवळीसोबतच्या फोटोमुळे संतोष जाधव याचे गवळी गँगसोबत संबंधाचा मुद्दा समोर आला आहे. संतोष जाधवचं गवळी गँगसोबत कनेक्शन आहे का? या अंगानेही पोलीस तपास करत आहे. गँगस्टर असलेला अरुण गवळी सध्या एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पोलिसांना ८ शूटर्सवर संशय आहे. यात पुण्यातील संतोष जाधव, सौरभ महाकाळ यांची नावं आहेत. पोलिसांच्या माहितीप्रमाणे शूटर्सची ओळख पटलेली असून, यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीये. मनप्रीत सिंग मन्नू असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण : सोबत सेल्फी घेणारा निघाला फितूर?, ३ दिवस घराची केली रेकी

सात आरोपी कोण?

जगरुप सिंग रुपा (तरणतारण, पंजाब)

हरकमल ऊर्फ रानू (भटिंडा, पंजाब)

प्रियव्रत ऊर्फ फौजी (सोनीपत, हरयाणा)

मनजीत ऊर्फ भोलू (सोनिपत, हरयाणा)

सौरव ऊर्फ महाकाळ (पुणे, महाराष्ट्र)

संतोष जाधव (पुणे, महाराष्ट्र)

सुभाष बनौदा (सिकर, राजस्थान)

या सर्व शूटर्सचं कनेक्शन लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. कॅनडात असलेल्या गोल्डी बरारच्या सांगण्यावरून त्यांनी सिद्धू मुसेवालाची हत्या केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp