Yo Yo Honey Sing च्या अडचणींमध्ये भर, पत्नीने केली मारहाण आणि मानसिक छळाची तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूडचा प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक यो यो हनी सिंग विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनीने हनी सिंग विरोधात दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचारात महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत याचिका दाखल केली आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने या प्रकरणी हनीसिंगला नोटीस पाठवली असून त्याच्याकडून उत्तर मागितलं आहे. 28 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यासाठी हनी सिंगला मुदत देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे शालिनीने तिच्या याचिकेत

हनी सिंगने मारहाण केली, लैंगिक शोषण केला, मानसिक छळ आणि आर्थिक फसवणूक केली असा आरोप शालिनीने याचिकेत केला आहे. हनी सिंगच नाही तर त्याचे आई वडील आणि बहिण यांच्या विरोधातही मारहाण करणं, छळ आणि शोषण असे आरोप केले आहेत. शालिनीने केलेल्या या याचिकेनंतर तीस हजारी न्यायालयाने हनी सिंग विरोधात नोटीस जारी केली आहे. दोघांची संयुक्त मालम्ता विकू नये, शालिनीबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले आहेत.

हे वाचलं का?

कोण आहे हनी सिंग?

ADVERTISEMENT

यो यो हनी सिंगचं खरं नाव हर्देश सिंग असं आहे. कॉकटेल चित्रपटानंतर यो यो हनी सिंगला प्रसिद्धी मिळाली. अंग्रेजी बिटसे हे गाणं त्यानं गायलं होतं जे गाणे प्रचंड लोकप्रिय झालं होतं. हनी सिंग आणि शालिनी यांचं लग्न 2011 मध्ये झालं आहे. आज ब्लू है पानी पानी हे त्याचं गाणंही बरंच लोकप्रिय झालं. तसंच चेन्नई एक्स्प्रेसच्या लुंगी डान्स या गाण्यानेही सगळे रेकॉर्ड तोडले होते. या गाण्यात हनी सिंग दीपिका पदुकोण आणि शाहरूखसोबत झळकला होता. हनी आणि शालिनी अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होते. 2011 मध्ये त्यांनी लग्न केलं. हनी सिंग ड्रग्जच्या आहारी गेल्याच्याही बातम्या आल्या होत्या. आता त्याच्या पत्नीने म्हणजेच शालिनीने हनी सिंग विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमुळे हनी सिंगच्या अडचणी वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT