चुंबन प्रकरणावरून एसआयटी,अन् फोटोमुळे माझ्यावर गुन्हा: संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay raut criticize shinde government : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर एका पीडितेचा फोटो ट्विट केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे ते अडचणीत सापडलो होते. कुटूंबातील व्यक्तीसाठी (अमृता फडणवीस) एसआयटी केली जाते आणि फोटो ट्विट केल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल केला जातो. राज्य़ाची कायदा सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय,अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.(sit on kiss case and case against me because of photo tweet sanjay raut criticize devendra fadnavis and eknath shinde)

संजय राऊत यांनी पीडितेला न्याय मिळावा यासाठी फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांना कारवाईचे करण्याचे आवाहन केले होते.मात्र हा फोटो टाकताना राऊत (sanjay raut) पिडीतेचा फोटो ब्लर करायला विरसले होते.त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याच विषयावर भाष्य केलं. कुटूंबातील व्यक्तीसाठी एसआयटी स्थापित केली जाते, एका चुंबनावरून एसआयटी स्थापित केली जाते, पण मी एका रक्ताच्या थारोळ्यात सापडलेल्या मुलीचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होतो. तसेच चुंबन प्रकरणात एसआयटी स्थापित होते, तर बार्शी प्रकरणात का नाही? असा थेट सवाल राऊत यांनी विचारत राज्यातील कायदा कोणत्या पद्धतीने काम करंतय हे दिसतंय. राज्य़ाची कायदा सुव्यवस्था कोठ्यावर नाचतेय,अशी टीका देखील केली.

‘त्या’ एका फोटोमुळे संजय राऊत अडचणीत, थेट पोलिसात गुन्हा दाखल

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निवडणूका कधीही घ्या आम्ही तयार…

हा देश फक्त भाजपच्या फायद्यासाठीच चालाय, भाजपला निवडणूका जिंकता याव्यात,भाजपला सत्ता मिळावी, त्याच्यापलीकडे यांचा विचार जात नाही आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.तसेच लोकसभा एकत्र घ्या, विधानसभा एकत्र घ्या, मुंबई महानगरपातलिका घ्या आधी? ती का घेत नाहीत? मुंबईसह महाराष्ट्रातील १४ महानगरपालिकांच्या निवडणूका आपण का रखडवून ठेवल्या आहेत?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदार संजय गायकवाडांची पुन्हा शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल

ADVERTISEMENT

दरम्यान भाजपचे एकच धोरण आहे सत्ता,सत्तेतून पैसा,आणि पैशातून पुन्हा सत्ता, त्यासाठी मग अडानी,मेहूल चोक्सी, नीरव मोदी यांना पाठीशी घालायचं. या धोरणातून राज्य चालत असेल, तर निवडणूका आणि सत्ता याशिवाय त्यांच्यात डोक्यात आणखीण काही चाललं नसेल असे मला वाटत नाही, अशी टीका देखील राऊत यांनी केली.संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT