पालघरच्या केळवे समुद्रात सहाजण बुडाले, चौघांचा मृत्यू दोघांना वाचवण्यात यश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पालघरच्या केळवे बीच या ठिकाणी असलेल्या समुद्रात सहा जण बुडाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. या ठिकाणी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ओम विसपुते (नाशिक)

दीपक वडकाते (नाशिक)

हे वाचलं का?

कृष्णा शेलार (नाशिक)

अथर्व नागरे (केळवे)

ADVERTISEMENT

अशी चार मृतांची नावं आहेत. जे सहा जण बुडाले त्यातले चार जण बाहेरचे तर दोन जण स्थानिक होते अशीही माहिती पोलिसांनी दिली.

ADVERTISEMENT

काय घडली घटना?

केळवे बीच या ठिकाणी समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या काही मुलांना प्रवाहात बुडत असताना नाशिकमधून आलेल्या काही मुलांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच घटनेत चारजणांचा मृत्यू झाला आहे. केळवे बीच येथील देवीचा पाडा या ठिकाणी राहणारी काही मुलं पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे नाशिकहून आलेले विद्यार्थीही पोहत होते. आता या ठिकाणी आलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. जे चार मृत आहेत त्यापैकी तिघेजण नाशिकचे तर एक स्थानिक आहे. या ठिकाणी शोध आणि बचावकार्यही सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT