Lok Sabha 2024 : "माझा मुलगा तुम्हाला सोपवतेय", सोनिया गांधी झाल्या भावूक

मुंबई तक

Raebareli Lok Sabha election 2024 : रायबरेली लोकसभा मतदारसंघातून यावेळी सोनिया गांधी यांच्याऐवजी राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत.

ADVERTISEMENT

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गाधी.
रायबरेली येथील प्रचार सभेत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रायबरेली लोकसभा मतदारसंघ

point

काँग्रेसकडून राहुल गांधी उमेदवार

point

सोनिया गांधी काय बोलल्या?

Rahul Gandhi Raebareli Lok Sabha : "तुमच्या प्रेमाने मला कधीही एकटं पडू दिलं नाही. मी माझा मुलगा सोपवत आहे. तुम्ही जसं मला आपलं मानलं, तसंच राहुललाही तुमचा म्हणून सांभाळा." (Sonia Gandhi made an emotional appeal to the people of Rae Bareli)

हे शब्द आहेत, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे! सोनिया गांधी यांनी शुक्रवारी रायबरेलीत एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्या भावूक झाल्या. 

सोनिया गांधींनी  लोकांना भावनिक आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राहुल गांधींना रायबरेलीमधून उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा >> पत्रकार परिषद घेत नाही कारण...; अखेर मोदींनी दिलं उत्तर 

केरळमधील वायनाडशिवाय राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढवत आहेत. शुक्रवारी जाहीर सभेदरम्यान सोनिया गांधी प्रचारसभेत भाषण करत असताना त्यांच्यासोबत कन्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधीही मंचावर उभे होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp