PM Modi : पत्रकार परिषद घेत नाही कारण...; अखेर मोदींनी दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांची मुलाखत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी.
social share
google news

PM Modi Interview : पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाही, असा सवाल विरोधकांकडून कायम उपस्थित केला जातो. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असेही विरोधक म्हणतात. याच मुद्द्यावर अखेर मोदींनी उत्तर दिले. पूर्वीची परिस्थिती आणि आताची यातील बदल अधोरेखित करत पंतप्रधानांनी पत्रकार परिषद न घेण्याची कारणं सांगितली. 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आज तक'ला खास मुलाखत दिली. 'इंडिया टुडे ग्रुप'चे न्यूज डायरेक्टर राहुल कंवल, मॅनेजिंग एडिटर अंजना ओम कश्यप, मॅनेजिंग एडिटर श्वेता सिंग आणि कन्सल्टिंग एडिटर सुधीर चौधरी यांनी पत्रकार परिषद न घेण्याबाबत आणि मुलाखती न देण्याबाबत मोदींना प्रश्न विचारला.

मोदी पत्रकार परिषद का घेत नाही?

तुम्ही जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होतात, तेव्हा अनेकवेळा मुलाखत घेण्याची संधी आपण द्यायचा. आता तुम्ही पंतप्रधान झाला आहात, तर तुम्ही पत्रकार परिषद घेत नाही आणि मुलाखत घेण्याची संधीही कधीतरीच मिळते. त्यामुळे लोक विचारतात की, मोदी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, तर पत्रकार परिषद का घेत नाहीत?, असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पहिली गोष्ट म्हणजे या निवडणुकीत जर मला कुठे बघितले जात असेल, 'आज तक'वर बघत असतील. मी कधीच नकार दिला नाही."

हेही वाचा >> '...तर मी सुद्धा मोदींच्या मदतीला धावून जाईन', ठाकरेंचं मोठं विधान

मोदी म्हणाले, "आपल्या माध्यमांबाबत अशी संस्कृती निर्माण झाली आहे की, काहीही करू नका, फक्त त्यांना सांभाळा. तुमचा मुद्दा सांगा, तो देशात जाईल. मला त्या वाटेने जायचे नाही. मला कष्ट करायचे आहेत. गरीबाच्या घरापर्यंत जायचे आहे. विज्ञान भवनात फीत कापण्याचा फोटो काढू शकतो. मी झारखंडच्या एका छोट्या जिल्ह्यात जातो आणि एका छोट्या योजनेसाठी काम करतो. मी एक नवीन कार्यसंस्कृती आणली आहे. माध्यमांना ती संस्कृती योग्य वाटली तर त्यांनी ती दाखवावी. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते करू नका."

ADVERTISEMENT

PM Modi : 'पूर्वी संवादाचे एकच होते साधन'

या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "पूर्वी संवादाचे एकच साधन होते, पण आज अनेक आहेत. पूर्वी तुम्ही माध्यमांशिवाय पोहोचू शकत नव्हते. आज संवादाची अनेक माध्यमे आहेत. आज माध्यमांशिवायही जनता आपला आवाज व्यक्त करू शकते. माध्यमांशिवाय कोणतीही व्यक्ती त्याचे उत्तर देऊ शकते."

ADVERTISEMENT

जुना प्रसंगाला उजाळा देत ते म्हणाले की, 'मी गुजरातमध्ये असताना जाहीर सभांमध्ये विचारायचो भाई असा कार्यक्रम का केला? कोणी काळे झेंडे घेऊन दिसत नाही. अरे भाऊ, दोन-तीन लोकांना काळे झेंडे घ्यायला लावा, उद्या वर्तमानपत्रात छापून येईल की मोदीजी आले तेव्हा दहा लोकांनी काळे झेंडे दाखवले. निदान लोकांना तरी कळेल की मोदीजी इथे आले होते. काळ्या झेंड्याशिवाय माझ्या सभेला कोण विचारणार? अशी भाषणे मी गुजरातमध्ये दहा वर्षे दिली. हे माझे रोजचे वेळापत्रक होते."

हेही वाचा >> '...तेव्हा नकली शिवसेना तोंडावर कुलूप लावते', PM मोदी ठाकरेंवर बरसले!

आणखी एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, 'एक दिवस माझ्या गावातील लोक मला भेटायला आले. जेव्हा ते मला शुभेच्छा देण्यासाठी आले तेव्हा त्यांनी सांगितले की, आमच्या गावात 24 तास वीज असते. म्हणूनच आम्ही तुमचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहोत. मंगळवारी माझ्या गुजरातमधील घरात कोणालाही प्रवेश असायचा. 24 तास वीज पुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मी म्हणालो ते खोटे आहे, ते शक्य नाही. ते म्हणाला नाही सर असते. तुमच्या गावात २४ तास वीज असते असे मी कोणत्याही वर्तमानपत्रात वाचले नाही, असे मी म्हणालो. तेव्हा ते म्हणाले, नाही साहेब, रेडिओवाले, वृत्तपत्रवाले सांगणार नाहीत की २४ तास वीज आहे."

    follow whatsapp

    ADVERTISEMENT