जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर भयानक हल्ला, भाषणापूर्वी फेकला बॉम्ब!
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर भयावह पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा हे पश्चिम जपानच्या बंदरगाहला भेट देण्यासाठी गेले असताना हा हल्ला झाला.
ADVERTISEMENT
Bomb Attack on Japan PM Fumio Kishida : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर भयावह पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे. पंतप्रधान फुमियो किशिदा हे पश्चिम जपानच्या बंदरगाहला भेट देण्यासाठी गेले असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते वाकायामा दौऱ्यावर असताना मोठा स्फोट झाला. पण या सर्वातून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या दिशेने स्मोक बॉम्ब फेकण्यात आला होता. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच हा हल्ला झाला. सुरक्षा दलांनी एका व्यक्तीला पकडले आहे. (Smoke bomb attack on Japan PM Fumio Kishida before His speech)
ADVERTISEMENT
वाकामाया येथे हा हल्ला झाल्यानंतर सगळीकडे धूर पसरला होता. ट्विटरवर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये आजूबाजूला गोंधळ उडाला आहे सर्वजण सुरक्षेसाठी पळताना दिसत आहेत.
रेल्वेत पॉर्न व्हिडीओ पाहू नका; या रेल्वे कंपनीने दिला प्रवाशांना सल्ला
पंतप्रधान किशिदा सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ हे भाषण करणार होते. जपानमधील पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था भारताच्या पंतप्रधानांसारखी नाही. जपानमध्ये खूप कडक कायदे आहेत. तिथे परदेशी लोक फार कमी आहेत. सुरक्षित देशात सुरक्षेची गरज नसते, मात्र शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत आढावा घेतला होता आणि याआधी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती, मात्र आता जपानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्फोटाबाबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा लागणार आहे कारण, हिरोशिमा शहरात G7 साठी तयारी सुरू आहे.
हे वाचलं का?
पंतप्रधान पदी फुमियो किशिदा यांची 2021 मध्ये नियुक्ती…
फुमियो किशिदा 2021 मध्ये जपानचे पंतप्रधान झाले. ते लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचेही (LDP) अध्यक्ष आहेत. त्यांनी 2012 ते 2017 पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आणि 2017 मध्ये त्यांनी कार्यवाहक संरक्षण मंत्री म्हणून काम केले. 2017 ते 2020 पर्यंत त्यांनी एलडीपी पॉलिसी रिसर्च कॉउंन्सिलचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या अवघ्या 28 वर्षीय भावाचं निधन, मृत्यूचं कारण…?
जपानमध्ये यापूर्वी शिंजो आबे यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला
जपानमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या राजकारण्यावर भयानक हल्ला झाला आहे. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचीही गेल्या वर्षी ८ जुलै रोजी गोळ्या झाडून हत्या केली होती. भाषणादरम्यानच शिंजो आबे यांच्यावर हल्ला करण्यात आला. नारा शहरात ते भाषण देत असताना हे घडलं होतं. त्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT