Smriti Irani : लेकीचं VIP गेस्टशिवाय 70 जणांमध्येच पार पडलं लग्न
Smriti Irani’s Daughter Marriage At Rajasthan : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) आणि झुबिन इराणी (Zubin Irani) यांच्या मोठ्या लेकीचं लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं. शेनेल इराणी (Shanelle Irani) असं तिचं नाव आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी शनेल अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) लग्नबंधनात अडकली. सात फेरे घेत दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी साथीदार म्हणून […]
ADVERTISEMENT
Smriti Irani’s Daughter Marriage At Rajasthan : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) आणि झुबिन इराणी (Zubin Irani) यांच्या मोठ्या लेकीचं लग्न अगदी धुमधडाक्यात पार पडलं. शेनेल इराणी (Shanelle Irani) असं तिचं नाव आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी शनेल अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) लग्नबंधनात अडकली. सात फेरे घेत दोघांनी एकमेकांना आयुष्यभरासाठी साथीदार म्हणून निवडलं. हे लग्न राजस्थानमधील (Rajasthan) नागौर येथील 500 वर्ष जुन्या ऐतिहासिक खिंवसार किल्ल्यावर झालं. या सोहळ्यासाठी संपूर्ण खिंवसर किल्ला आकर्षकरित्या सजवण्यात आला होता.
ADVERTISEMENT
राजस्थानची संस्कृती, तिथल्या चालीरीती-परंपरेनुसार शाही लग्नात पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले. राजेशाही थाटात अर्जुन भल्लाची मिरवणूक खिंवसार किल्ल्याच्या आत काढण्यात आली. स्मृती इराणी यांनी त्यांच्या जावयाचे जोरदार स्वागत केलं. यावेळी किल्ल्यात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
‘मोदीजी आमचं सरकार तुमच्याच आशीर्वादाने बनलंय’, CM शिंदे काय बोलून गेले?
हे वाचलं का?
असा होता शनेल-अर्जुनच्या लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम
सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित नवनवीन अपडेट समोर येत आहेत. अर्जुन भल्लाची विंटेज कारच्या ताफ्यासह मिरवणूक निघाली. सकाळी साडेसात ते साडेनऊपर्यंत खास वाळवंटामध्ये नाश्त्याचे आयोजन करण्यात आलं होतं. नंतर, सकाळी 11 वाजता चुडा समारंभ व दुपारी 12.30 वाजता भोजनाचा कार्यक्रम झाला. त्याचवेळी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गडावरूनच ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली.
ADVERTISEMENT
मिरवणुकीत पोहोचल्यावर वधू पक्षाच्या लोकांना पगडी घालण्यात आली. यानंतर मिरवणुकीचे स्वागत करून वरमाळा घालण्याचा सोहळा संपन्न झाला.
ADVERTISEMENT
Shivsena नेतृत्व कमजोर होतं का? पटोलेंचा राऊतांना सवाल
VIP पाहुण्यांशिवाय अवघ्या 70 लोकांच्या उपस्थितीत विवाह पडला पार!
खिंवसार किल्ल्यावरील शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या लग्नाला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि काही निवडक पाहुणे उपस्थित होते. केवळ 70 लोकांच्या उपस्थितीत शनेल आणि अर्जुनचा विवाह पार पडला. स्मृती इराणी यांनी लग्नासाठी कोणत्याही व्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित केलं नव्हतं.
तीन दिवस कार्यक्रम अतिशय भव्य पद्धतीने पार पडले. त्याचवेळी शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या लग्नानंतर रिसेप्शनसाठीही खास जागा निवडण्यात आली होती. पूलच्या बाजूला त्यांचं रिसेप्शन झालं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT