अमानुष ! पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला मारहाण, पार्श्वभागात कारलं-मिरची पावडर टाकली
माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला परत घरी आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली आहे. इतकच नव्हे तर सासरच्या मंडळींनी आपल्या जावयाच्या पार्श्वभागात कारलं खोचून, मिरची पावडर टाकून त्याला मारहाण केली. बुलड़ाणा जिल्ह्यातील मोताळा येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणात ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ४ जणांना अटक करण्यात आली […]
ADVERTISEMENT
माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला परत घरी आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केली आहे. इतकच नव्हे तर सासरच्या मंडळींनी आपल्या जावयाच्या पार्श्वभागात कारलं खोचून, मिरची पावडर टाकून त्याला मारहाण केली. बुलड़ाणा जिल्ह्यातील मोताळा येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणात ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
२२ वर्षीय पीडित जावई हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर कबाडवाडी भागात राहतो. ४ जुलै रोजी हा युवक आपल्या पत्नीला आणण्यासाठी बुलडाणा मोताळा येथील कॉटन मार्केट परिसरात आला होता. यावेळी आरोपीरामराव भाऊराव पवार,विजय रामराव पवार,रवी रामराव पवार, राजू रामराव पवार, विकास सर्जेराव पवार, देवकाबाई, छायाबाई, नंदाबाई, रेवाबाई, कलुबाई व देवानंद रामभाऊ मोहिते या ११ जणांनी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पीडित युवकाचे हातपाय दोरीने बांधून अंगणात बांधून ठेवले. पीडित युवकाच्या अंगातील फुलपॅन्ट व अंडरवेअर काढून त्याच्या पार्श्वभागात मिरची पावडर व कारले खोचले.शिवाय शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी,केबलच्या वायरने पाठीवर व कंबरेवर अमानुषपणे मारहाण केली.
सासरच्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर या तरुणाने बोरखेडी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन ४ जणांना अटक केली आहे. दरम्यान अटकेतील ४ आरोपींना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मोताळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहत असलेल्या रामभाऊ भाऊराव पवार यांच्या मुलीशी मे २०२० मध्ये लग्न झाले आहे. दरम्यान, मागील दोन ते तीन महिन्यापासून पीडित युवक आणि त्याच्या पत्नीच्या वाद सुरू होते. म्हणूनच पीडित युवकाची पत्नी तेव्हापासून मोताळा येथे माहेरी राहत होती आहे. दरम्यान काही दिवसा अगोदर पीडित युवकाने काही लोकांसोबत घेऊन सासरीकडील मंडळीसोबत वाद घातला होता. त्यानंतर पीडित पती ४ जुलैला पत्नीला आणण्यासाठी गेला असता त्याच्यात आणि सासरकडील लोकांमध्ये वाद झालं. या वादातून सासरच्या मंडळींनी जावयाला मारहाण केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT