कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगम पुढे सरसावला; ऑक्सिजन पुरवठ्याची करणार मदत
कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हायरसचा प्रसार अधिक होताना दिसत असून रूग्णांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसतेय. अनेक ठिकाणी बेड्स तसंच ऑक्सिजनची कमतरता दिसून येतेय. रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आलेत. अशातच आता सिंगर सोनू निगमनेही मदतीचा हात पुढे केलाय. कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगमने गोल्फर क्रिशिव टेकचंदानी […]
ADVERTISEMENT
कोरोना व्हायरसने संपूर्ण देशाची परिस्थिती गंभीर झाली आहे. व्हायरसचा प्रसार अधिक होताना दिसत असून रूग्णांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसतेय. अनेक ठिकाणी बेड्स तसंच ऑक्सिजनची कमतरता दिसून येतेय. रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आलेत. अशातच आता सिंगर सोनू निगमनेही मदतीचा हात पुढे केलाय.
ADVERTISEMENT
कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी सोनू निगमने गोल्फर क्रिशिव टेकचंदानी यांच्यासोबत मिळून मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वेबसाईटच्या माहितीनुसार, सोनू निगम कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी मोबाइल ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात मदत करणार आहे. गंभीर परिस्थितीत असलेल्या कोरोना रूग्णांना ऑन डिमांड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दोन हजार एकवीस पोर्टेबल ऑक्सिजन कॅनिटर्स देण्याचं सोनूने सांगितलं आहे. सोनूच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या व्यक्तींना ऑक्सिजन मिळत नाही अशा व्यक्तींना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येईल.
सोनूने इन्स्टाग्रावरूनही याबाबत माहिती दिली आहे, “वेळ कठीण आहे आणि आपण एकत्र उभे राहून या कठीण वेळेवर मात करण्याची गरज आहे. पुढे या आणि आपापल्या परिने इतरांचा जीव वाचवा. @krishiv_golfer यांच्यासोबत मी येत्या आठवड्यात आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन कॅनिटरची व्यवस्था करणार आहे.”
हे वाचलं का?
अजून एक काश्मिर तयार होतोय…, प.बंगाल निवडणूकीच्या ट्रेंडवरून कंगनाचा हल्लाबोल
सोनू निगम प्रमाणे अनेक सेलेब्रिटींनी कोरोनाग्रस्त रूग्णांना मदतीचा हात पुढे केलाय. यामध्ये सोनू सूद, ट्विंकल खन्ना तसंच अजय देवगण या सेलिब्रिटींचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT