WPL Kiran Navgire: सोलापूरच्या पोरीनं बॅटवर लिहलं धोनीचं नाव, ठोकलं अर्धशतक
Kiran Navgire writes MSD 07 on her bat : देशभरात सध्या वुमेन्स प्रिमियर लीगची (Wpl) चर्चा आहे. ही लीग सुरू झाल्यापासून एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. त्यात रविवारी पार पडलेल्या युपी वॉरीयर्स आणि गुजरात जायंटस (up warriors vs gujarat giants)यांच्यात रंगलेल्या सामन्यातील एका महिला खेळाडूची खुप चर्चा रंगली आहे. या खेळाडूचे नाव किरण […]
ADVERTISEMENT
Kiran Navgire writes MSD 07 on her bat : देशभरात सध्या वुमेन्स प्रिमियर लीगची (Wpl) चर्चा आहे. ही लीग सुरू झाल्यापासून एकापेक्षा एक दर्जेदार सामने पार पडत आहे. त्यात रविवारी पार पडलेल्या युपी वॉरीयर्स आणि गुजरात जायंटस (up warriors vs gujarat giants)यांच्यात रंगलेल्या सामन्यातील एका महिला खेळाडूची खुप चर्चा रंगली आहे. या खेळाडूचे नाव किरण नवगिरे (Kiran Navgire) आहे. या खेळाडूची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे, बॅटवर कोणत्याही स्पॉन्सररचे नाव नसताना, तिने ति्च्या आवडत्या खेळाडूचे नाव लिहून खणखणीत अर्धशतक ठोकले होते. तिच्या या बॅटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच तिच्या खेळीचे देखील कौतूक होत आहे (sponsorless bat kiran navgire write msd 07 and hit the half century up warriors vs gujarat giants)
ADVERTISEMENT
बॅटवर धोनीच लिहलं नाव
युपी वॉरियर्सकडून (up warriors) 27 वर्षाची किरण नवगिरे (Kiran Navgire) ही खेळाडू वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये खेळत आहे. रविवारी गुजरात जायंटस विरूद्धच्या सामन्यात तिला बॅटींगची संधी मिळाली होती. ज्यावेळेस ती मैदानावर उतरली होती त्यावेळेस तिच्या बॅटीवर एकाही कंपनीची स्पॉन्सरशीप नाव दिसले नव्हते. याउलट तिच्या बॅटीवर स्केचपेने एक नाव लिहण्यात आले होते. हे नाव कॅमेरा ज्यावेळेस तिच्या बॅटींग जवळ गेला, त्यावेळेस क्रिकेट फॅन्सना दिसले होते. हे नाव माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) होते. किरणच्या बॅटीवर ”एमएसडी 07” लिहण्यात आले होते. हे नाव पाहून सर्वंच अवाक झाले होते.
किरणची अर्धशतकी खेळी
किरण (Kiran Navgire) ज्यावेळेस बॅटींगसाठी मैदानात उतरली होती, त्यावेळेस युपीने 13 धावावर 1 विकेट गमावला होता. युपीला संघाला यावेळी चांगल्या पार्टनरशीपची आवश्यकता होती. कारण त्यांना गुजरातने दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करायचा होता. किरणने 43 बॉलमध्ये 53 धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. तिने 123.26 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. या तिच्या धावांमुळे व इतर सह खेळाडूंमुळे हा सामना युपीने 3 विकेट्सने जिंकला.
हे वाचलं का?
कोण आहे किरण नवगिरे ?
किरण नवगिरे (Kiran Navgire) ही मुळची सोलापूरची आहे. तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला 2016 पासून सुरुवात केली आहे. मात्र क्रिकेट कारकिर्दीपुर्वी ती एक अॅथलीट होती. यावेळी तिने भाला फेक, शॉट पूट आणि रिले शर्यतीत भाग घेतला होता. अॅथलीट्समध्ये अनेक पदक आणि ट्ऱ़ॉफी जिंकल्यानंतर तिने क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. किरण ही टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला आपला आदर्श मानते. धोनीचा कुल स्वभाव आणि षटकार मारण्याची क्षमतेमुळे ती क्रिकेटकडे वळली होती. एकीकडे इतर खेळाडू आपल्या बॅटींगची सुरूवात संथ गतीने करत असताना, दुसरीकडे किरण मात्र बॅटींगची सुरूवात षटकार मारून करते. तिच्या या शैलीचे क्रिकेट फॅन्स दिवाने आहेत.
रेकॉर्ड
किरण नवगिरे (Kiran Navgire) महिला आईपीएल आधी वुमेन्स टी20 वेलोसिटीसाठी सुद्धा खेळली आहे. तिच्यावर नावावर एक खास रेकॉर्ड देखील आहे. सीनियर महिला टी20 ट्रॉफीमध्ये नागालॅंडकडून खेळताना तिने टुर्नामेंटमध्ये 525 धावा केल्या होत्या. तसेच महाराष्ट्र संघातून निवड न झाल्याने तिने नागालँड संघाकडून खेळून 76 बॉलमध्ये 162 धावा ठोकल्या होत्या. टी20 क्रिकेटमध्ये वैयक्तिक डावात 150 धावांचा टप्पा ओलांडणारी ती पहिली महिला खेळाडू बनली आहे. तिचा हा रेकॉर्ड आतापर्यंत कोणत्याच खेळाडूला ब्रेक करता आला नाही आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान पहिल्याच सामन्यात किरण नवगिरे (Kiran Navgire)आपल्या उत्कृष्ट खेळीने चर्चेत आली आहेत. आता पुढच्या सामन्यात ती कशी खेळी करते याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT