माळशेज घाटात बस थांबली, कंडक्टर खाली उतरला अन् थेट दरीत उडी मारली; आत्महत्येचं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्मिता शिंदे/मिथिलेश गुप्ता, मुरबाड: अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटातील एका दरीत एसटी वाहकाने दरीत अचानक उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. गणपत मारुती इदे असे आत्महत्या करणाऱ्या एसटी वाहकाचे नाव आहे. ते भंडारदरा येथे कुटूंबासह राहत होते.

ADVERTISEMENT

कल्याण ते अकोले ही अकोले एसटी आगरची बस आज (8 जून) दुपारच्या सुमारास कल्याणहून नगर जिल्ह्यातील अकोले बस आगरमध्ये निघाली होती. त्यातच याच एसटीत वाहक म्हणून मृत गणपत कार्यरत होते.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

गणपत इदे हे भंडारदरा येथील रहिवासी असून अकोले आगारात वाहक म्हणून काम करत होते. आज ते कल्याणला जणाऱ्या बससाठी वाहक म्हणून कामावर हजर होणार होते. काल ते सुट्टीवर होते. त्यामुळे आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास MH-14-BT-4450 क्रमांकाची एसटी बस अकोले आगाराच्या बसमधून ते कल्याणच्या दिशेने निघाले.

ADVERTISEMENT

यावेळी प्रवास करत असताना बस जेव्हा माळशेज घाटातील बोगद्याच्या पुढे गेल्यावर एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावर थांबली. हा रस्ता मागील 1 महिन्यापासून दुरुस्तीसाठी बंद आहे. पावसाळ्यात घाटात अपघात होऊ नये म्हणून वायररोप आणि तारा टाकण्याचे काम इथे सुरू असल्याने येथे एकेरी वाहतुक सुरू आहे. जेव्हा याच ठिकाणी बस काही काळ थांबली तेव्हा गणपत इदे हे बसमधून उतरले आणि त्यांनी थेट खोल दरीत उडी घेतली. ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ

दरम्यान, या घटनेची माहिती टोकावडे पोलिसांना मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी दरीत वाहकाचा मृतदेह शोधून उत्तरणीय तपासणीसाठी मुरबाडमधील शासकीय रुग्णालयात रवाना केलं. मात्र, वाहक गणपत यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही समोर आले नाही. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती टोकावडे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT