कर्जाचं ओझं! एसटीचालकाने बसमध्येच घेतला गळफास; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात शेतकरी आत्महत्यांपाठोपाठ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरूच आहे. संगमनेरमध्ये आणखी एका एसटी चालकाने आत्महत्या केल्यीची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाच्या चिंतेनं एसटी चालकाने बसमध्येच गळफास घेऊन जीवन संपवलं.

ADVERTISEMENT

सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पाथर्डी-नशिक (एम. एच. १४, बी. टी. ४८८७) या बसमध्ये चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संगमनेर बसस्थानकात ही बस उभी होती. सुभाष तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असं या चालकाचं नाव आहे.

पहाटे पाच वाजता ते व इतर चार सहकारी प्रात: विधी व इतर आटोपून फ्रेश झाले होते. त्यानंतर त्यांनी इतरांना सांगितलं की, ‘मी पुढे जातो, तुम्ही पाठीमागून या.’ त्यानंतर पंधरा मिनिटांनी एसटी बस वाहक येथे आला असता, त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत चालकाचा मृतदेह आढळून आला.

हे वाचलं का?

सुभाष तेलोरे यांनी मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांच्यावर सुमारे साडेसहा लाख रुपये कर्ज असल्याचं नमूद केलेलं आहे. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह संगमनेरच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तातडीने हस्तक्षेप करा; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

ADVERTISEMENT

यापूर्वीही राज्यात अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री या ठिकाणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एस.टी कर्मचाऱ्याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचं चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT