बीड : परळी आगारात ST चालकाकडून विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई तक

राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही मागे घेतला नाहीये. विलनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातले एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यात काही आगारांमध्ये पोलीस संरक्षणात एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. बीडमधील परळी आगारात एका एसटी चालकाने विष पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नागनाथ गित्ते असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. परळी आगाराचे एस.टी कर्मचारी गेल्या 35 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजुनही मागे घेतला नाहीये. विलनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातले एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यात काही आगारांमध्ये पोलीस संरक्षणात एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. बीडमधील परळी आगारात एका एसटी चालकाने विष पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नागनाथ गित्ते असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

परळी आगाराचे एस.टी कर्मचारी गेल्या 35 दिवसापासुन कर्मचाऱ्यांना शासनात विलनीकरण करा या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत.परंतु काल पहिल्यांदाच नागनाथ गित्ते हा चालक आणी वाहक मोहन गित्ते हे कामावर हजर झाल्याने एस.टी.च्या अधिकारी व पोलिस संरक्षणात परळी बीड बस सोडण्यात आली होती. मात्र काल एक फेरी मारल्यानंतर आज गित्ते यांनी विष घेतल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान चालक नागनाथ गित्ते यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांनी विष का घेतलं ? हे अद्याप अस्पष्ट आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp