बीड : आर्थिक विवंचनेतून एसटी बस चालकाची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्थिक विवंचनेतून बीडमध्ये वास्तव्यास असलेल्या एसटी बसचालकाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. बीडच्या अंकुशनगर भागात वास्तव्यास असलेल्या तुकाराम सानप यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.

ADVERTISEMENT

तुकाराम सानप हे बीड आगारात चालक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून सानप हे तुटपुंज्या वेतनामुळे अडचणीत सापडले होते. त्यातही बऱ्याचदा वेतन वेळच्यावेळी मिळत नसल्यामुळे बऱ्यातचे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागायचा. या नैराश्यातूनच सानप यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सातारा : हिरकणी रायडर्स ग्रूपच्या शुभांगी पवार यांचा अपघाती मृत्यू

हे वाचलं का?

या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी पोहतच पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. सानप यांच्या पश्चात त्यांना पत्नी व दोन लहान मुलं आहेत.

नागपूर : भाडेकरुच्या जाचाला कंटाळून घरमालकाची आत्महत्या

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT