शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, सुप्रिया सुळेंसह अजितदादा आणि रोहित पवारही होते हजर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज (31 मार्च) पहाटेच्या सुमारास यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या गॉलब्लॅडरमधील (पित्ताशयातील) खडे काढण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज (31 मार्च) पहाटेच्या सुमारास यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या गॉलब्लॅडरमधील (पित्ताशयातील) खडे काढण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शरद पवार यांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत’
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजच ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल
शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु असताना रुग्णालयात त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या हजर होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर राजेश टोपे यांनी त्याबाबतची माहिती मीडियाला दिली. ‘शस्त्रक्रियानंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या पित्ताशयातून यशस्वीरित्या स्टोन काढण्यात आला आहे.’