Jacqueline Fernandez च्या नावानं सुकेश चंद्रशेखरचं तुरूंगातून पत्र, ख्रिस्तमसनिमित्त थेट द्राक्ष बाग भेट...

मुंबई तक

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर यानं ख्रिसमसच्या मुहूर्तावर जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने जॅकलिनला एक खास गिफ्ट दिलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिनसाठी खास पत्र...

point

ख्रिस्तमसनिमित्त दिलं भलं मोठं गिफ्ट

point

तुरुंगात कैद असलेला सुकेश म्हणाला मी...

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर यानं ख्रिसमसच्या मुहूर्तावर जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिलं आहे. 'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार या पत्रात सुकेशने लिहिलं की, "एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही मला तुझा सांताक्लॉज खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. माझ्या प्रिये, तुझ्यासाठी हा ख्रिसमस खूप खास आहे."


सुकेशने पुढे लिहिलं, "बेबी गर्ल, मेरी ख्रिसमस. माझं प्रेम, आणखी एक सुंदर वर्ष आणि आमचा आवडता सण एकमेकांशिवाय जातोय. पण आमचं मन एकमेकांशी जोडलेलं आहे. तुला ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना, असं वाटतंय की आपला हात एकमेकांच्या हातात आहे आणि मी तुझ्या डोळ्यात बघतोय" 

सुकेशने पुढे लिहिलं, "आज मी तुला वाईनच्या बाटलीने आश्चर्यचकित करणार नाही, मी तुला 'फ्रान्स'मध्ये असलेली एक पूर्ण द्राक्ष बाग भेट देत आहे, एक अशी जागा, जी तू फक्त स्पप्नातच पाहिली असशील"

'107 वर्षे जुनी द्राक्ष बाग...'

सुकेशने पुढे जॅकलिनसाठी लिहिलं, "बेबी, तुझा सांता आज तुझी इच्छा खरी करतो आहे. तुझी ख्रिसमसची भेट... जी मी तुला आज देतोय... 107 वर्षांची एक सुंदर टस्कन शैली असलेली द्राक्ष बाग... माझ्या प्रिये तुझ्यासाठी ख्रिसमसची ही खास भेट. तुला ती नक्की  आवडेल."

हे वाचलं का?

    follow whatsapp