ते कधीच अशा गोष्टींवर बोलत नाहीत; सुप्रिया सुळेंचं नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना दिसत आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलं असून, त्यांच्या मौनावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया यांनी टोला लगावला आहे. ते कधीच अशा घटनांवर बोलत नाहीत’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर भूमिका मांडली. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना दिसत आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलं असून, त्यांच्या मौनावरून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया यांनी टोला लगावला आहे. ते कधीच अशा घटनांवर बोलत नाहीत’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाबद्दल सविस्तर भूमिका मांडली.
सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लखीमपूर खीरी येथील घटनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हा राज्य सरकारने केलेला हल्ला असल्याचं सांगत मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
‘न्यायालयाने जे सांगितलं ते बरोबरच आहे. लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. लोक शांततेनेच आंदोलन करत होते. कुणीही चुकीच्या गोष्टी करत नव्हते. व्हिडीओ जर बघितला, तर शांततेत आंदोलन करताना अंगावर गाडी घालण्यात आली आहे’, असं सु्प्रिया सुळे म्हणाल्या.
लखीमपूर खीरी हिंसाचार : नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या; राहुल गांधींचा गंभीर आरोप