Swapnil Lonkar च्या कुटुंबीयांचं सुप्रिया सुळेंकडून सांत्वन, कर्ज फेडण्याचंही आश्वासन
वसंत मोरे, प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. तसे स्वप्नीलच्या कुटुंबीयांची सांत्वन करत त्याच्या बहिणीच्या शिक्षण आणि नोकरीची हमी खासदार सुळे यांनी घेतली. स्वप्नीलने 29 जून रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात दिसून […]
ADVERTISEMENT

वसंत मोरे, प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. तसे स्वप्नीलच्या कुटुंबीयांची सांत्वन करत त्याच्या बहिणीच्या शिक्षण आणि नोकरीची हमी खासदार सुळे यांनी घेतली.
स्वप्नीलने 29 जून रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात दिसून आले. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर आज बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्यातील केडगाव या ठिकाणी स्वप्नीलच्या आई वडिलांची भेट घेतली. स्वप्नीलच्या कुटुंबाचे सांत्वन करताना यांनी स्वप्नीलच्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी घेण्याची हमी दिली. यावेळी स्वप्नीलच्या बहिणीला एक मोबाईल देखील भेट दिला तसेच त्यांच्यावर असलेल्या कार्याची माहिती घेऊन त्याचा पूर्ण निपटारा करण्याचे आदेश सुळे यांनी दिले आहेत. याशिवाय एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धीर देत प्रयत्न करावेत, सरकार त्यांच्या पाठीशी आहे मात्र कोणत्याही प्रकारचा टोकाचा निर्णय घेऊ नये असे आवाहन सुळे यांनी यावेळी केले.