हिंदू देवी-देवतांचा अपमान?, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सापडली वादात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Taapsee pannu trolled for Photo : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मात्र असाच एक फोटो पोस्ट करणं तिला महागात पडलं आहे. कारण तिने शेअर केलेल्या फोटोवर आता हिंदू देवी देवतांचा (Hindu Goddess) अपमान होत असल्याचा आरोप करण्याय येतोय.फॅन्सनीच हा आरोप तिच्यावर केला असून तिला कडक शब्दात सुनावले आहे.दरम्यान तापसीच्या या फोटोत अपमानजनक असं काय आहे? हे जाणून घेऊयात.(taapsee pannu brutally trolled for wearing goddess laxmi necklace with revealing dress)

तापसी पन्नूने (Taapsee pannu) नुकताच लॅकमी फॅशन वीकमध्ये सहभाग नोंदवला होता. या फॅशन शोमध्ये तिने रॅम्प वॉक देखील केला होता.हा रॅम्प वॉक करतानाचा तिने घातलेल्या आऊटफीटमुळे ती वादात सापडली आहे.खरं तर तापसीने तिच्या गळ्यात एक नेकलेस घातला होता, या नेकलेसने तिच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Salman Khan : गँगस्टरच्या धमकीबद्दल सलमान खानचं काय आहे म्हणणं?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेकलेसमध्ये असं काय आहे?

तापसी पन्नूने (Taapsee pannu) इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल कलरचा ड्रेस परीधान केला आहे. या ड्रेसचा गळा खुपच खोल आहे.यासोबतच तिने गळ्यात एक नेकलेस घातला आहे. हा नेकलेस लक्ष्मीच्या मुर्तीचा आहे. त्यामुळे इतक्या बोल्ड ड्रेसमध्ये तिने हा नेकलेस घातल्याने फॅन्स चांगलेच भडकले आहेत. तसेच तिला सोशल मीडियावर ट्रोल करतातयत.

ADVERTISEMENT

फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

तापसी पन्नूच्या (Taapsee pannu)य़ा फोटोवर फॅन्स खुपच संतापले आहे. फॅन्सनी तिच्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. अश्लील फोटोत हा लक्ष्मी देवीचा अपमान असल्याचे एका युझरने म्हटलेय.तापसी पन्नू तुला लाज वाटली पाहिजे अशी कमेंट एका दुसऱ्या युझरने केली आहे.कोणत्याही धर्माचा सिंबल कुठे प्रतिनिधीत्व केला पाहिजे हे एक अभिनेत्री म्हणून तुला माहिती पाहिजे,अशी देखील कमेंट एका फॅनने केली आहे. तापसीच्या या फोटोवर मोजक्याच लोकांनी तिचे कौतूक केलेय, तर अनेकांनी तिच्यावर हिंदू देवी-देवतांचा आरोप केलाय.

ADVERTISEMENT

दुसरी पत्नी हेलनला घरी आणलं तेव्हा वडिलांनी सलमान-अरबाजला एकच सांगितलेलं..

तापसीच्या (Taapsee pannu) वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तापसी पन्नू लवकरच शाहरूख खानच्या डंकी या सिनेमात दिसणार आहे.यासोबत तिच्याकडे अनुभव सिन्हाचा अफवाह हा सिनेमा देखील आहे. तापसीने नुकतेच फिर आई हसीन दिलरूबा सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा हसीन दिलरूबाचा सिक्वेल आहे.

गँगस्टरच्या धमकीनंतर सलमानची सुरक्षा वाढवली, गॅलॅक्सी बाहेर पोलिसांचा पहारा

दरम्यान आता या प्रकरणात तापसी पन्नू (Taapsee pannu) काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र तिचा हा फोटो खुपच वादात सापडलाय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT