सूर्यवंशी सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली; उद्धव ठाकरेंकडून रोहित शेट्टीचं कौतुक
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या सिनेमासाठी प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागणार आहे. 30 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार होता. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या सिनेमासाठी प्रेक्षकांना अजून वाट पहावी लागणार आहे. 30 एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार होता. मात्र आता पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचं सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे सूर्यवंशी सिनेमा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचं कौतुक केलं.
कोरोना रूग्णांची संख्या वाढतेय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये थिएटर्स आणि नाट्यगृह पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याचा फटका बॉलिवूड तसंच मराठी इंडस्ट्रीला बसण्याची शक्यता आहे. थिएटर्स बंद असल्याने सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याचसाठी रोहीत शेट्टीने आगामी ‘सूर्यवंशी’ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT