WhatsApp Update : काम झालं सोप्पं! लेटेस्ट फिचरमुळे फोटोवरील टेक्स्ट करता येणार कॉपी

मुंबई तक

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप दैनंदिन आयुष्यातील संपर्काचं एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. कोणतंही वैयक्तिक असो किंवा ऑफिससंबंधित काम असो, व्हॉट्सअॅप हे सहज संपर्क करण्याचं एक साधन बनलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन फिचर्ससह अपडेट होत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्संना आणखी एक भेट दिली आहे. आता कंपनीने iOS यूजर्ससाठी टेक्स्ट डिटेक्शन फिचर (WhatsApp Text Detection Feature) लाँच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप दैनंदिन आयुष्यातील संपर्काचं एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. कोणतंही वैयक्तिक असो किंवा ऑफिससंबंधित काम असो, व्हॉट्सअॅप हे सहज संपर्क करण्याचं एक साधन बनलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवनवीन फिचर्ससह अपडेट होत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या यूजर्संना आणखी एक भेट दिली आहे. आता कंपनीने iOS यूजर्ससाठी टेक्स्ट डिटेक्शन फिचर (WhatsApp Text Detection Feature) लाँच केलं आहे.

Maharashtra Live: त्याशिवाय सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवारांना संताप अनावर

नवीन टेक्स्ट डिटेक्शन फिचरच्या मदतीने, iOS यूजर्स फोटोवर लिहिलेलं टेक्स कॉपी करू शकतील. याआधी आयओएसमध्ये हे फिचर मिळालं होतं. परंतु, व्हॉट्सअ‍ॅपने हे फिचर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर जोडलेलं आहे. यामुळे यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवरूनच फोटोवरील संपूर्ण टेक्स्ट कॉपी करता येईल.

WhatsApp वरील नवीन टेक्स्ट कॉपी फिचर अशाप्रकारे करा अपडेट…

व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन अपडेट बीटा व्हर्जनचा भाग नाहीये. याबाबतची संपूर्ण माहिती WABetaInfo ने शेअर केली आहे. जर तुम्ही IOS यूजर असाल आणि तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हे फिचर अजून अपडेट झालेलं नाहीये तर, यासाठी अॅप स्टोअरवर जाऊन व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावं लागेल. यानंतर हे नवीन फिचर मिळेल.

Satara: पाटणमध्ये गोळीबार, दोन ठार; ठाण्यातील मदन कदम पोलिसांच्या ताब्यात

टेक्स्ट डिटेक्शन फिचरमध्ये जर यूजरला फोटोवर लिहिलेलं टेक्स काढायचं किंवा कॉपी करायचं असेल तर याठिकाणी एक ऑप्शनही देण्यात आला आहे. या ऑप्शनवर क्लिक करून, फोटोमधील टेक्स्ट काढता किंवा कॉपी करता येईल. पण, हे पिचर व्यू वन्स मोडवर पाठवलेल्या फोटोला सपोर्ट करत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप असे आणखी नवीन फिचर लाँच करण्याच्या तयारीत!

व्हॉट्सअ‍ॅपने इतर अनेक फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे. असंच एक फिचर म्हणजे ऑडियो स्टेटस आहे. या नव्या फिचरच्या मदतीने 30 सेकंदांचा ऑडिओ स्टेट्स ठेवता येईल. यासह स्टेट्स रिअॅक्शनचा फिचरही जोडला जाईल

हे वाचलं का?

    follow whatsapp