Mansukh Hiren : सचिन वाझेंना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. सचिन वाझे यांची चौकशी एटीएस मार्फत करण्यात आली. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठीही सचिन वाझे यांनी अर्ज केला. मात्र या अर्जावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे. कोर्टाने सध्या त्यांना अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. कोर्टात झालेल्या युक्तीवादा दरम्यान सचिन वाझे हजर नव्हते. मात्र सचिन […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिला आहे. सचिन वाझे यांची चौकशी एटीएस मार्फत करण्यात आली. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठीही सचिन वाझे यांनी अर्ज केला. मात्र या अर्जावर १९ मार्चला सुनावणी होणार आहे. कोर्टाने सध्या त्यांना अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. कोर्टात झालेल्या युक्तीवादा दरम्यान सचिन वाझे हजर नव्हते. मात्र सचिन वाझे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असा युक्तीवाद केला की मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी फक्त संशय व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणात कोणताही प्रथमदर्शनी पुरावा या प्रकरणात सचिन वाझेंच्या विरोधात नाही. एवढंच नाही तर एटीएस सचिन वाझेंना त्रास देतं आहे. मनसुख हिरेन प्रकरणाशी सचिन वाझेंचा काहीही संबंध नाही असंही वाझे यांच्या वकिलांनी सांगितलं. मात्र अंतरिम सुरक्षा देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
ADVERTISEMENT
Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन
सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. विमला हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार सचिन वाझे हे या प्रकरणात आहेत असं दिसतं आहे असं वकील विवेक कडू यांनी म्हटलं आहे. वाझे हे मनसुख हिरेन यांच्या संपर्कात फेब्रुवारी २०२१ पर्यंत होते त्यामुळे या सगळ्या प्रकरणी त्यांची चौकशी झाली पाहिजे. हा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी या प्रकरणी वाझेंनी जो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे त्यावर १९ मार्चला सुनावणी होईल असं स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
कार इंटिरिअरच्या व्यवसायात असलेले मनसुख हिरेन यांचं ठाण्याला क्लासिक कार डेकोर हे दुकान आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्चला मुंब्रा येथील खाडीत मिळाला होता. या प्रकरणी आधी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आता हे प्रकरण सरकारने एटीएसकडे सोपवलं आहे.
Antilia ते सचिन वाझे व्हाया मनसुख हिरेन, आजवर काय-काय घडलं?
ADVERTISEMENT
विमला खरे यांनी काय आरोप केले आहेत?
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन यांच्या मालकीची असलेली स्कॉर्पिओ ही चार महिने सचिन वाझेंकडे होती. ही तीच स्कॉर्पिओ आहे जी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घराबाहेर आढळली होती. माझ्या पतीची हत्या करण्यात आली आहे ही हत्या सचिन वाझेंनी केल्याचा संशय मला आहे असं विमला हिरेन यांनी म्हटलं आहे.
या स्कॉर्पिओमध्ये जिलेटीनच्या कांड्या होत्या. २६ फेब्रुवारीला ही कार अँटेलिया बाहेर आढळून आली होती. या स्कॉर्पिओ कार प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT