भावाला म्हणाली, ‘वाल्मिकी त्रास देतोय’; भाऊबीजेच्या आधीच बहिणीनं घेतला गळफास
आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची आठवण करून देणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पोलीस दलातील महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊबीज तोंडावर आलेली असताना भावाला मेसेज करत महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. ठाणे जिल्ह्यातील वसई येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने पोलिसाच्या त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील देलवडी […]
ADVERTISEMENT
आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येच्या घटनेची आठवण करून देणारी घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पोलीस दलातील महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊबीज तोंडावर आलेली असताना भावाला मेसेज करत महिलेनं टोकाचं पाऊल उचललं.
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील वसई येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलने पोलिसाच्या त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील देलवडी या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिपाली कदम असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे. दिपाली कदम या ठाणे येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. परंतु पालघर येथील पोलीस नाईक वाल्मिक गजानन आहिरे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दिपालीच्या भावाने दिली आहे.
शिवकुमार माझ्या मुलीचा खूप छळ करत होता! दीपाली चव्हाण यांच्या आईचा टाहो
हे वाचलं का?
वाल्मिक आहिरे हा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. काही दिवसांपूर्वी दिपालीचं लग्न देखील ठरले होते, परंतु वाल्मिक याने होणाऱ्या सासरच्या लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली. दिपाली आणि मी लग्न करणार आहे, असंही त्याने तिच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींना सांगितलं. तिने तुमच्या मुलासोबत लग्न केलं तरी, ती दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येईल. त्यामुळे तिच्याशी लग्न करू नका, असं त्याने दिपालीच्या सासरच्या मंडळींना धमकावलं होतं.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशी समितीकडून ‘क्लिन चीट’
ADVERTISEMENT
वाल्मिकी आहिरेकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून दिपालीने बुधवारी मध्यरात्री घरातील अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. वाल्मिक वेळोवेळी त्रास देत असल्याच्या कारणावरून आत्महत्या करत आहे, असा मेसेज दिपालीने मृत्यूपूर्वी तिच्या भावाला पाठवला होता. वाल्मिकच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT