MPSC बाबतचा निर्णय मला अंधारात ठेवून घेण्यात आला-वडेट्टीवार
MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभरातल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांचा हा उद्रेक समोर आल्यानंतर आता या प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे? “माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून घेतलेला हा निर्णय […]
ADVERTISEMENT
MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभरातल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांचा हा उद्रेक समोर आल्यानंतर आता या प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलं आहे.
ADVERTISEMENT
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?
“माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून घेतलेला हा निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेवून निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल” असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
हे वाचलं का?
माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल. @abpmajhatv @TV9Marathi @zee24taasnews pic.twitter.com/fdeaHtSxcG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 11, 2021
“माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून घेतलेला हा निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही. मला अंधारात ठेवून निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात येईल”
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
ADVERTISEMENT
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC ची परीक्षा आज पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. कोरोना रूग्णांचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा ठाकरे सरकारविरोधात रोष पाहण्यास मिळाला.
ADVERTISEMENT
MPSC बाबत एक लेखी पत्र आलं होतं या पत्राची अंमलबजावणी करत आजचं परिपत्रक काढण्यात आलं. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला गेला. मात्र विजय वडेट्टीवार यांनी हा निर्णय आपल्याला अंधारात ठेवून घेतलला गेल्याचं म्हटलं आहे.
MPSC ची तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी रस्त्यावर
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे आक्रमक
एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज जाहीर झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? या निर्णयावर तातडीने फेरविचार झाला पाहिजे अशी भूमिका सत्यजीत तांबे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजीची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या निर्णयाविरोधात हे विद्यार्थी निदर्शनं करत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर हेही या आंदोलनात सहभागी आहेत. विरोधी पक्षांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT